शिरूरला रस्त्यावर फिरणाऱ्यांना पोलिसांचा दणका...

शिरूर, ता. 26 मार्च 2020 (PoliceKaka): देशभरात 14 एप्रिलपर्यंत लॉक डाऊन असतानाही काहीजण रस्त्यांवर उतरताना दिसत आहेत. बेजबाबदार नागरिकांना शिरूर पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. संबंधित छायाचित्रे आणि व्हिडिओ सोशल मीडियावरून व्हायरल होत आहेत.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी लागू झाल्यानंतर प्रशासनाने आता कंबर कसली असून शासनाचे आदेश धाब्यावर बसवून विनाकारण दुचाकीवरून अथवा पायी रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांना आता पोलिसांच्या कारवाईस सामोरे जावे लागत आहे. तमाम नागरिकांचे या विषाणू पासून रक्षण व्हावे म्हणून स्वतः दिवस रात्र पहारा देणा-या पोलीस कर्मचाऱयांसह महसूल, आरोग्य विभाग देखील सतर्क झाला आहे. नागरिकांना आवाहन करून ही अनेक बेजबाबदार नागरिक स्वतः मास्क न लावता भाजीपाला व इतर साहित्य घेण्यासाठी फिरताना दिसत आहेत.

शिरूर शहरात भाजीपाला घेताना नागरिकांची मोठीच गर्दी केली होती. अनेकांनी सुरक्षितता म्हणून नाकावर रुमाल किंवा मास्क लावलेले दिसत नव्हते. एस टी बंद असल्याने शिरूर बसस्थानकात पूर्ण शुकशुकाट आहे. शिरूर तालुक्यातील विविध गावांमध्ये रोग प्रतिबंधात्मक औषध फवारणी करण्यात आली आहे.देशात २१ दिवसांसाठी कर्फ्यू लागू झाल्यानंतर ही आज अनेक नागरिक शिरूर शहरात फिरताना दिसत होते. अशा बेजबाबदार सुज्ञ नागरिकांना शिरूरचे पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे व त्यांच्या पथकाने चांगलाच पोलिसी झटका दिला. पोलिस प्रशासन जीवाची पर्वा न करता आपल्यासाठी रस्त्यावर फिरून नागरिकांची सुरक्षा म्हणून नागरिकांना घरी थांबण्याचे आवाहन करीत असताना अनेक जण शहरात व गावात फिरत आहेत. शिरूर पोलिसांच्या या धडक कारवाईचे तालुक्यातून स्वागत होत आहे. शिरूर पोलिसांच्या पथकाने विविध भागात फिरून नागरीकांना घरी थांवबण्याचे आवाहन केले आहे.
No photo description available.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या