शिरूर तालुक्यातील अनेक गावांनी केले रस्ते बंद...

शिरूर, ता. 26 मार्च 2020 (PoliceKaka): करोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी न्हावरे (ता. शिरूर) येथील गावात येणारे सर्व रस्ते ग्रामपंचायतीच्या वतीने बॅरीगेट लावून ३१ मार्च पर्यंत बंद केले आहेत. शिरूर तालुक्यातील अनेक गावांनी रस्ते बंद केले आहेत.
कोरोना व्हायरसपासून गावाचे संरक्षण करण्यासाठी विविध गावांच्या ग्रामपंचायतींनी पाऊल उचलले आहे. गावचे रस्ते बंद केले असून, काळजी घेतली जात आहे. न्हावरे दुरक्षेत्र पोलिसांच्या वतीने येथील श्री. मल्लिकार्जुन विद्यालयाच्या चौकात शिरूर-न्हावरे-चौफुला राज्यमार्गावर येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना मज्जाव केला जात आहे. सर्व विचारपूस करूनच वाहने सोडली जात आहेत. शिवाय,यस्थानिकांना फिरण्यासाठी बंदी केली आहे. त्यामुळे न्हावरे गाव परिसर लॉकडाऊन करण्यात आला असून, बाहेरून गावात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर ग्रामपंचयतीच्या कर्मचाऱ्यांकडून लक्ष ठेवण्यात येत आहे. बाहेरून येणाऱ्या व्यक्तीला खबरदारी म्हणून येथीलच ग्रामीण रुग्णालयात पाठवले जात आहे. अशा व्यक्तींची संपूर्ण माहिती घेऊनच त्यांना सोडण्यात येत आहे. त्यामुळे न्हावरे पोलिस व ग्रामपंचायतीच्या वतीने योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन ग्रामपंचायतीने केले आहे.


न्हावरे परिसरातील हॉस्पिटल्स, मेडिकल हे पूर्वी प्रमाणेच सुरू राहणार असून, किराणा मालाची दुकाने दुपारी १२ ते ३ यावेळेतच सुरू असतील तर भाजीपाला सकाळी ११ ते ४ यावेळेतच नागरिकांना मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांनी गर्दी करू नये. दोन किंवा तीन व्यक्तींनीच भाजीपाला व किराणा दुकानांमध्ये खरेदीसाठी यावे, असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या