शिरूरमध्ये सातजणांच्या हातावर क्वारंटाइनचे शिक्के...

शिरूर, ता. 26 मार्च 2020: शिरूर शहरात होम क्वारंटाइनचे सातजण असून, हे सर्व परदेशातून आलेले आहेत. त्यांच्या डाव्या हातावर प्रशासनाने शिक्के मारले आहेत, असे लोक फिरताना आढळल्यास त्वरित पोलिसांना सांगावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
करोना व्हायरसचा प्रादूर्भाव व संसर्ग होऊ नये म्हणून खबरदारीचा उपाय घेणे आवश्यक आहे. शिवाय, संचारबंदी नियम पाळणे व शिरूर नगरपालिका व शिरूर पोलिस स्टेशन यांच्यावतीने शिरूर शहरवासीय व व्यापारी यांच्यासाठी आचारसंहिता तयार केली आहे, अशी माहिती शिरूरच्या तहसीलदार लैला शेख व पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे व मुख्य अधिकारी महेश रोकडे यांनी दिली.

शिरूर पोलिस स्टेशन यांच्या वतीने शिरूर शहरातील किराणामाल असोसिएशन, ड्रगिस्ट आणि केमिस्ट असोसिएशन, भाजीपाला व्यवसायिक, दूध डेअरी असोसिएशन यांची बैठक बोलावण्यात आली होती. शिरूर पोलिस स्टेशनच्या वतीने शहरात संचार बंदीबाबत कारवाई करण्यात यावी, अशा सूचना तहसीलदार लैला शेख यांनी पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांना दिल्या. शिरुर नगर परिषद प्रशासनानेही नागरिकांमध्ये जनजागृती करावी अशी सूचना दिल्या.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या