शिक्रापूर मधील कोरोनाचे वास्तव अन् भयानक 30 तास...

शिरूर, ता. 26 मार्च 2020: शिरूर तालुक्यात कोरोना व्हायरचा रुग्ण सापडला आणि एकच खळबळ उडाली. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने माहिती घेऊ लागला. सोशल मीडियावर चर्चांना उधान आले. पण, यादरम्यान, रुग्ण, डॉक्टर आणि त्यांच्या नातेवाईकांची काय अवस्था झाली असेल.सोशल मीडियावर सध्या 'शिक्रापूर मधील करोना चे वास्तव व नायडू मधील भयानक 30 तास. एक विदारक सत्य व त्याची सुरुवात' या शीर्षकाखाली एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तो जशाचा तसा...

ता.१८-३-२०२० बुधवार चा दिवस हॉस्पिटल चा फोन वाजला साधारणपणे सकाळचे साडे बारा वाजले असतील समोरील व्यक्ती आकांताने ओरडुन बोलली की इमर्जन्सी अंबुलन्स पाठवा accident झाला आहे पेंशट ला खूप लागलं आहे क्षणार्धात अंबुलन्स पोहचली पेशंट ला उचलून हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले त्यांनंतर पुढे सुरू झाला सर्व खेळ मी व माझे सहकारी डॉ. यांनी पेशंट ला casualty मध्ये घेण्यास सांगितले आणि आम्ही पेशंट ला बघण्यासाठी casualty कढे निघालो बघताच क्षणी प्रथमदर्शणी असे दिसले की पेशंट च्या उजव्या पायाचे हाड तुटलेले आहे ( # Tibia fracture) बाकी पेशंट ला काही त्रास नव्हता (BP/ HR/SPO2 All NORMAL /CHEST CLEAR,NO - COLD,COUGH FEVER) चला सिस्टर intra. लावा, चल रे xray काढ, चल रे तू लॅब घे सर्व गोष्टी घडू लागल्या मी म्हणालो नातेवाईक कोण आहेत या माझ्या सोबत प्रथम दर्शनी पेशंट च्या पायाचे हाड मोडलेले दिसत आहे xray झाल्यावर पुढील ट्रीटमेंट बद्दल बोलू........१० min XRAY आला operation कराव लागेल त्यासाठी  xxx एवढा खर्च अपेक्षित आहे असे नातेवाईकांना सांगितले. नातेवाईक म्हणाले येथील एक हाडांचे डॉ. आमच्या ओळखीचे आहेत आम्ही पेशंट ला त्या हॉस्पिटल मध्ये घेऊन जातो..... ( शिक्रापूर मधीलच दुसरे हॉस्पिटल)  ...पेशंट ला शांतपणे आमची ambulance दुसर्या हॉस्पिटल ला सोडून आली तिथून पुढे त्यांची तयारी सुरू झाली.....त्याच रात्री म्हणजे १८/३/२०२० रात्रीच्या १२ वाजता पेशंट ला श्वसनाचा त्रास व्हायला लागला तेथील डॉ. सर्व बाजूंनी विचार करून पेशंट ला कदाचित   Pulmonary Embolism असेल त्यामुळे कदाचित श्वसनाचा त्रास होऊ शकतो अशी कल्पना नातेवाईकांना दिली ( पायाचे हाड मोडल्यावर रक्ताची गुठळी किंवा चरबी फुप्फुसात अडकते) व पुढील तपासणी व ट्रिटमेंट साठी पेशंट ला वाघोलीला घेऊन जाण्याचा सल्ला दिला.......पेशंट वाघोलीतील एका मोठ्या खासगी हॉस्पिटलमध्ये १९/३/२०२० ला पहाटे २ वाजता icu मध्ये ऍडमिट झाला त्याठिकाणी त्याच्या सर्व चाचण्या करण्यात आल्या व त्या नुसार ट्रिटमेंट सुरू झाली..... पेशंटवर पुढील ४ दिवस म्हणजे २२/३/२०२० पर्यंत त्या हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले परंतु तरी देखील त्याला त्रास होतंच होता म्हणून त्याला नगररोड वरील शास्त्री नगर येथील प्रसिद्ध हॉस्पिटल ला पुढील उपचारा साठी पाठविण्याचा निर्णय झाला व त्याला तिकडे icu मध्ये शिफ्ट करण्यात आले सर्व तपासण्या नॉर्मल असून देखील पेशंट ला श्वसनाचा त्रास होत आहे म्हणून तेथील डॉ.नी करोना ची तपासणी करण्याचा निर्णय घेतला व तो सोमवारी म्हणजे २३ -३-२०२० ला positive आला असे आम्हाला तेथील authority कडून सांगण्यात आले आणि सुरू झाली धावाधाव अरे कोण कोण होत पेशंट चेंक करताना कोणी कोणी हात लावला काय काय precaution घेतले होते सर्व गोष्टींनी जणू डोक्यात गोंधळ उडाला आभाळ फाटले आणि पायाखालची वाळूच सरकली स्वतः ची चिंता तर होतीच पण सर्वात जास्त माझ्या हॉस्पिटल मधील कुटुंबाचा प्रमुख म्हणून प्रचंड टेन्शन  प्रत्येकाचा चेहरा डोळ्यासमोर येत होता पण रात्रीचे 2 वाजले होते कस सांगू कोणाला उठवू काहीच समजत नव्हतं संपूर्ण रात्र जागून काढली आणि दिवस उजेडताच फोनाफोनी सुरू झाली तू कुठेस, हा कुठे सगळ्यांना गोळा करा आणि चला सर्व जण नायडू ला काळजी करू नका कोणाला काहीही होणार नाही सर्वांना मी धीर देत होतो पण आतून तुटत होतो की हातावरच पोट असलेल्या माझ्या स्टाफ च माझं व माझ्या कुटुंबाच काय होणार आम्ही positive आहोत का ?? मनात प्रचंड शंका घोळत होत्या तसेच शिक्रापूर मधीलच दुसऱ्या हॉस्पिटल चे प्रमुख डॉ.  यांच्याशी देखील फोनवरून संपर्क झाला व ते देखील सर्व स्टाफ सह नायडू ला पोहचले आम्हाला सर्वांना करोना संशयित म्हणून admit करून घेतलं व आमच्या नाकातील ,तोंडातील swab  व रक्ताचे नमुने तपासणी साठी NIV ला पाठविण्यात आले व रिपोर्ट यायला २४ तास लागतील झोपून राहा असा सल्ला डॉ.नी दिला आता रात्र कशी काढायची रिपोर्ट काय येतील सर्व प्रश्न चिन्ह.......समोर सर्व अंधार दिसत होता. तो पर्यंत शिरूर तालुक्यात वाऱ्यासारखी बातमी पसरली दोन हॉस्पिटल बंद , करोना positive रुग्ण दोन दिवस शिक्रापूर मध्ये ऍडमिट होता (वास्तविक पाहता तो 12 तास सुद्धा शिक्रापूर मध्ये ऍडमिट नव्हता)घरचे, मित्र, पुढारी, पत्रकार, नातेवाईक, हितचिंतक सर्वांचे वारंवार फोन येत होते संपूर्ण तालुक्यात अफवांच एक पेवच फुटलं होत जणू काही हा डॉ. positive तो कर्मचारी positive म्हणजे आम्ही नायडू ला असून देखील आम्हाला काही गोष्टी माहीत नव्हत्या त्या अफवांच्या माध्यमातून आम्हाला समजत होत्या खरंच खुप खचून गेल्यासारखं वाटत होतं पण वारंवार आम्ही एकमेकांना धीर देत होतो आमच्या दोघांचे ही हॉस्पिटल कोणी सील केले नव्हते किंवा आम्हाला कोणीही हॉस्पिटल बंद करा म्हणून सांगितले नव्हते परंतु स्टाफ सेफ्टी आणि जर आम्हाला करोना झाला असेल तर तो पसरू नये म्हणून आम्ही दोन्ही हॉस्पिटल ने तो निर्णय घेतला होता......बाकी इकडे सर्व अफवांच काहूर माजलं होतं.करोना positive रुग्णाच्या नातेवाईकांना पण  हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले होते....... सर्व काही भयानक न सांगता येणार होत.

आयुष्यात पहिल्यांदाच हरल्या सारखं वाटत होतं सोशल मीडिया बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रात आमचे डॉ. मित्र व हित चिंतक एकमेकांना उदा. देऊन सांगत होते बघा त्या भिलवाडा आणि शिक्रापूर ला डॉ. सोबत काय झालं हॉस्पिटल क्लिनिक बंद ठेवा अजूनही वेळ गेली नाही अश्या अनेक गोष्टी आम्ही वाचत होतो ,ऍडमिट स्टाफ एकदम शांत होता त्यांचे घराचे मालक त्यांना फोन करून दमदाटी करत होते. तुमच्या मुळे आम्हाला करोना होईल असे म्हणत होते,शेवटी चिंता वाटत होती मला पण ती न दाखवता आम्ही एखादा विनोद करायचो आणि काही काळ का होईना आम्ही सर्व हसण्याचा प्रयत्न करत होतो नाहीतर आम्ही सर्व जण असे एकत्र कधी राहिलोच नसतो करोना ने तो योग जुळवून आणला. सकाळ उजडली आमच्या फेऱ्या सुरू झाल्या आला का रिपोर्ट आला का रिपोर्ट सारखा तेथील सिस्टर व डॉ. आम्ही त्रास देत होतो.आणि ३० तासांनंतर रिपोर्ट आले आमच्या शिक्रापूर मधील दोन्ही हॉस्पिटल चे सर्व डॉक्टर व स्टाफ या सर्वांचे रिपोर्ट  negative आले आणि सर्वांचा जीव भांड्यात आला व पुढचे सर्व विचार थांबले.सर्व जण आनंदीत दिसत होते.

नायडू हॉस्पिटल तर्फे आम्हाला उत्तम जेवण, नाश्ता राहण्याची सोय अत्यंत चांगल्या प्रकारे करण्यात आली होती.त्याबद्दल पुणे महानगरपालिका व महाराष्ट्र शासनाचे खूप खूप आभार तसेच या सर्व परिस्थिती त आम्हाला आमच्या घरचे आई, वडील, पत्नी, मुलगा बहीण भाऊ, शिक्रापूर मधील स्थानिक पत्रकार 🐅 , ज्या ज्या मित्र परिवाराने साथ दिली धीर दिला त्या सर्वांचे आभार मानतो शतशः ऋण व्यक्त करतो ...........आम्ही निर्णय घेतलाय परत त्याच जोमाने आणि धैर्याने आम्ही आमच्या शिक्रापूर वासीयांना आरोग्य सेवा देऊ परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्या प्रमाणे पुढील २१ दिवस घरात बसणे आपले कर्तव्य आहे........ आम्ही आमचे वैद्यकीय सेवा देण्याचे काम मोबाईल द्वारे, video calling च्या माध्यमातून सुरूच ठेवू यात शंका नाही.

 माझे माझ्या सर्व डॉ. मित्रांना सांगणे आहे ते भयानक 30 तास आम्ही अनुभवले आहेत......तुम्ही तिथं पर्यंत जाऊ नका स्वतः ची काळजी घ्या आपलं कुटुंब आपली वाट बघत असतं हे विसरू नका  !!!
(सौजन्यः सोशल मीडिया)

No photo description available.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या