नागरगाव येथील गावठी दारूसाठा कोरोना स्टाईलने नष्ट...

Image may contain: one or more people and outdoor
मांडवगण फराटा, ता. २८ मार्च २०२० (प्रमोल कुसेकर): नागरगाव (ता. शिरूर) येथील अवैध दारू धंद्यावर शिरूरचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्या आदेशान्वये व साहाय्यक पोलीस निरीक्षक बिरदेव काबुगडे यांच्या मार्गदर्शनाखाली मांडवगण फराटा पोलीस दूरक्षेत्र टीमने कारवाई करून १२ हजार रुपये किमतीची ६०० लिटर हातभट्टी दारू नष्ट केली आहे.दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई (दि. २५) रोजी करण्यात आली.नागरगाव येथील कोद्रे वस्ती भीमा नदीकाठी पप्पू कोळेकर, भाऊसाहेब पवार हे गावठी दारू काढत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.यावेळी मांडवगण फराटा पोलीस पोलीस हवालदार अे. जे. जगदाळे, के. एल. ढुके, ए. एन. तारू, होमगार्ड एस. जी. जगताप, ए. एस. शेख, एम. एल. शेख यांच्या पथकाने या ठिकाणी छापा घातला.

Image may contain: text that says 'भाषण करायला शिका... लाखो लोकांसमोर निर्भयतेने बोला! Art of Speech मो.नं. 9860927799 9615927799 प्रभावी वक्तृत्वाचा पासवर्ड... फक्त इथेच!'

गावठी दारू बनविण्याच्या तयारीत असणारे दोघेजण पोलीस आल्याची माहिती मिळताच असता हातभट्टी दारू तयार करण्याची साधने जवळ बाळगून दारू तयार करण्याच्या तयारीत होते.परंतु, त्यांना पोलीस येत आहेत, याची चाहूल लागताच हे साहित्य त्याठिकाणी टाकत ते पळाले.४ प्लॅस्टिक बॅरल, हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन व इतर साहित्य याप्रमाणे १२ हजारांचा माल मिळून आला.कच्चे रसायन पंचासमक्ष त्याचठिकाणी नष्ट करण्यात आले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या