वाघोलीत परप्रांतीय नागरिकांना मिळणार मोफत जेवण...


वाघोली, ता. 29 मार्च 2020 (PoliceKaka): देशात लॉकडाऊन झाल्यानंतर परप्रांतीय नागरिकांचे हाल होऊ लागले आहेत. यामुळे ते घाबरून आपल्या घराकडे निघाले आहेत. पण, संचारबंदी असल्यामुळे त्यांना जाता येत नाही. या परिस्थितीत त्यांचे हाल होताना दिसत होते. पण, आता हे हाल थांबणार आहेत.लोकप्रतिनिधी व लोणीकंद पोलिसांच्या वतीने परप्रांतीय नागरिकांची समजूत काढून त्यांना थांबवण्यात आले आहे. नागरिकांवर आलेली उपास मारीची वेळ लक्षात घेऊन वाघोली ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच, उपसरपंच सर्व सदस्य, भाऊसाहेब, ग्रामस्थ व लोणीकंद पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रताप मानकर या सर्वांच्या सहकार्याने वाघोली गावात पर राज्यातून आलेल्या कामगार वर्गाला रविवार (ता. 29) पासून सकाळी १००० नागरिक व संध्याकाळी जवळपास १००० नागरिकांच्या जेवनाची सोय वाघोली ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे, अशी माहिती सरपंच वसुंधरा उबाळे, माजी सरपंच शिवदास उबाळे यांनी दिली.वाघोली परिसरात ज्या-ज्या भागात हे लोकं राहत आहेत त्यांना त्या जागेवर जेवण पोहोच केले जणार आहे असून, एका ठिकाणी गर्दी होणार नाही याची काळजी देखील घेण्यात आली आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या