तळेगाव ढमढेरे येथे कोरोना बाबत 'हे' ठराव संमत...

तळेगाव ढमढेरे. ता. 29 मार्च 2020 (एन. बी. मुल्ला): कोरोना आपत्ती निवारण समितीच्या बैठकीमध्ये जीवनावश्यक वस्तूंसह विविध विषयांचे ठराव मंजूर करून संबंधित विभागांना पत्र पाठवून कार्यवाही करण्यात आल्याचे समितीचे अध्यक्ष व तलाठी डी.एस.भराटे यांनी सांगितले.


तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने करण्यात येणाऱ्या उपाय योजनेसाठी गावपातळीवर कृती समिती गठीत करण्यात आली असून कोरोना आपत्ती निवारण समितीची बैठक ग्रामपंचायत कार्यालयात पार पडली. यावेळी आपत्ती निवारण समितीचे अध्यक्ष डी.एस.भराटे, समितीचे सदस्य कैलास लोहार, आर.के.चौधरी, अविनाश आल्हाट, महिला बचत गटाच्या अध्यक्षा आरती भुजबळ, शैला भुकने, पोलीस पाटील पांडुरंग नरके, ग्रामविकास अधिकारी संजय खेडकर आदी उपस्थित होते.या बैठकीत पुढील ठराव संमत करण्यात आले आहेत -
जीवनावश्यक किराणा दुकान, रेशन धान्य दुकान, भाजीपाला - दूध विक्री, वैद्यकीय औषधे (मेडिकल), दवाखाने पूर्णवेळ चालू ठेवणे, गुजर प्रशाले समोर, विठ्ठलवाडी रस्ता, न्हावरा रस्ता याठिकाणी बॅरिकेट लावणे, बाहेरून येणार्‍या लोकांची यादी करणे व या व्यक्तींना १४ दिवस होम कोरंटाईन करणे, खाजगी दवाखाने बंद करू नयेत, भाजीपाला मार्केट पर्यंत नेण्यासाठी शेतकऱ्यांना परवाना देणे, परिसरात कचरा टाकू नये, सफाई करावी, विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलीस स्टेशनने कडक कारवाई करावी, गरजूंना रेशन दुकानातून धान्य द्यावे. यासाठी ग्रामपंचायतमध्ये नोंद करावी, भविष्यात विलगीकरण कक्ष म्हणून कुमार जयसिंगराव ढमढेरे प्राथमिक शाळा ताब्यात घेणे, पॅरा मेडिकल स्टाफ-डॉक्टर-नर्स गरज पडल्यास घेणे, अंगणवाडी सेविका व आशा स्वयंसेविका यांनी आरोग्य खात्यात मदत करणे असे महत्त्वपूर्ण ठराव या बैठकीत करण्यात आले. याची पत्राद्वारे त्वरित अंमलबजावणी करण्यात आल्याचे कोरोना आपत्ती निवारण समितीचे अध्यक्ष डी.एस.भराटे यांनी सांगितले.


No photo description available.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या