शिरूर तालुक्यातील सर्व व्हेंटिलेटर करणार जमा...

शिरूर, ता. 30 मार्च 2020: कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमिवर शिरूर तालुक्यातील सर्व हॉस्पिटलमधील व्हेंटिलेटर जमा करण्याचे प्रयोजन करण्यात येणार आहे, असे आमदार अशोक पवार व तहसीलदार लैला शेख यांनी सांगितले.


शिरूर शहरात नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू आहे. यांचे गांभीर्य लक्षात घेऊन भाजीपाला, किराणा, दूध, मेडीसीन घरपोच सेवा देण्यासाठी प्रयत्न शासन पातळीवर सुरू आहे. तालुक्‍यातील सर्वच हॉस्पिटलमधील व्हेंटिलेटर जमा करण्यात येणार आहेत. परप्रांतीय नागरिकांसाठी जेवणाची सोय लवकरच करण्यात येणार आहे. त्यामुळे परप्रांतीय नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

करोना आजारासंदर्भात उपाययोजना, संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्यासाठी शिरूरचे आमदार पवार यांच्या नेतृत्वाखाली शासकीय अधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे, शिरुर नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी महेश रोकडे, पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे, डॉ. स्वप्नील भालेकर उपस्थित होते.


बैठकीत शिरूर शहरात विनाकारण फिरणाऱ्या नागरिक व तरुणांवर यापुढील काळात कडक कारवाई करण्यात येणार आहे. शहरात असणारे अनाथ, परप्रांतीय दुसऱ्या जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरून जाता कामा नाही. कोणीही पायी वगैरे आपापल्या गावी जाण्याची प्रयत्न करू नये. तुमची काळजी प्रशासनाच्या माध्यमातून घेणार आहे. लवकर राहण्यासाठी शाळा ताब्यात घेऊन त्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे ठरले आहे. यावेळी शहरातील नागरिकांनी करोनाबद्दल गंभीरपणे घेणे गरजेचे आहे. शिरूर शहरामध्ये इन्शुलन्स वॉर्ड, हॉस्पिटलसाठी वेगवेगळ्या हॉस्पिटलची पाहणी करण्यात आली.

गोरगरीब जनतेला धान्य वाटपाची केंद्र शासनाच्या योजना आहे. योजनेतील धान्य लवकर शहरातील, शिरूर, हवेली तालुक्‍यातील गोरगरीब नागरिकांना उपलब्ध करून द्यावे म्हणून आमदार पवार यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याशी संपर्क साधून लवकर धान्यांची व्यवस्था करण्याची सूचना दिली आहे. यावेळी शिरूर येथील आपत्कालीन समितीच्या वतीने सोमवारी (ता. 30) रक्‍तदान शिबिराचे आयोजन केले आहे, असे आपत्कालीन समितीचे सदस्य संतोष शितोळे यांनी सांगितले.


सणसवाडीत 17 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह...
तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे म्हणाले, शिरूर तालुक्‍यातील सणसवाडी येथील रुग्ण आढळल्यानंतर या भागातील संशयित 17 जणांना नायडू हॉस्पिटल येथे पाठवून त्यांची करोनाची चाचणी घेण्यात आली होती. परंतु, या 17 जणांचे करोना व्हायरसचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. सर्व ठिकाणी जंतुनाशकाची फवारणी करण्यात आली आहे. नागरिकांनी घाबरून न जाता घराबाहेर पडू नये विनंती करण्यात आली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या