शिक्रापूर पोलिसांनी परप्रांतीयांना केले एकत्र अन्...

शिक्रापूर, ता. 1 एप्रिल 2020 (PoliceKaka): करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊननंतर उपासमारीची वेळ येऊ लागल्याने अनेकांनी पायी घरचा रस्ता धरला. शिक्रापूर पोलिसांनी पायी निघालेल्या परप्रांतीयांना एकत्र करत त्यांची जेवण व निवासाची व्यवस्था केली. शिक्रापूर पोलिसांचे कौतुक होत आहे.


शिक्रापूर जवळील पुणे-नगर रस्त्याने अनेक परप्रांतीय नागरिक पिशव्या भरून पायी जात असल्याचे शिक्रापूर पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर काही पोलिसांनी त्या नागरिकांची विचारपूस केली असताना 'आम्ही कामाला म्हणून इकडे आलो होतो, सध्या काम नाही, कोठे खाण्यापिण्याची सोय नाही, करणार काय म्हणून गावाला निघालो. गाड्या पण बंद आहेत, करणार काय? आम्हाला काय करावे सुचेना म्हणून आम्ही आता पायी रस्त्याने चालत आहे. कोठे काही मिळाले तर खातोय' असे सांगत ते सर्व परप्रांतीय मध्यप्रदेशला निघाले.शिक्रापूर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक किरण भालेकर, हवालदार संजय ढमाळ, सचिन मोरे, पोलिस नाईक विलास आंबेकर, ब्रम्हा पोवार यांनी सर्वांना एका वाहनात बसवून कोरेगाव भीमा येथील अल अमीन कॉलेजमध्ये घेऊन जात त्यांना समजावून सांगत तेथे त्यांच्या राहण्याची, जेवणाची सर्व व्यवस्था केली. यावेळी महसूल विभागाचे देखील काही कर्मचारी येथे उपस्थित झाले होते. जोपर्यंत बंद आहे आणि सर्व सुरळीत चालू होत नाही, तोपर्यंत या सर्व नागरिकांची सर्व व्यवस्था व्यवस्थितपणे केली जाणार आहे, असे पोलिस उपनिरीक्षक किरण भालेकर यांनी सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या