दूरसंचार कंपन्या देणार मोफत टॉकटाईम...

Image may contain: possible text that says 'vodafone !dea'
मुंबई, ता. १ एप्रिल २०२० (प्रतिनिधी): लॉकडाऊनच्या ट्रायने दूरसंचार कंपन्यांना आपल्या प्रीपेड ग्राहकांच्या प्लॅनचा कालावधी वाढवण्यास सांगितले होते. त्यानंतर बीएसएनएल-एमटीएनएल, जिओ, व्होडोफोन-आयडिया आणि एअरटेलने आपल्या ग्राहकांच्या प्रीपडे प्लॅनचा कालावधी वाढवला आहे.

BSNL आणि MTNL
सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएल आणि एमटीएनएलने आपल्या प्रीपेड ग्राहकांचा टॉकटाइम कालावधी २० एप्रिलपर्यंत वाढवला आहे. सोबतच १० रुपये टॉकटाईम देण्याचा देखील निर्णय घेतला आहे.

Airtel
एअरटेलने देखील आपल्या ८ कोटी ग्राहकांना मोठी भेट देत, कालावधी १७ एप्रिलपर्यंत वाढवला आहे.सोबतच १० रुपये मोफत टॉकटाईम देण्याचा निर्णय घेतला आहे.

Jio
लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांना अडचणीचा सामना करावा लागू नये यासाठी जिओने आपल्या ग्राहकांचा कालावधी 17 एप्रिलपर्यंत वाढवला आहे. याशिवाय मोफत १०० मिनिट कॉलिंगसाठी दिले आहेत. ग्राहकांना १०० एसएमएस देखील जिओने दिले आहेत.

Vodafone-Ieda
व्होडा-आयडियाने देखील आपल्या १० कोटी ग्राहकांचा कालावधी १७ एप्रिलपर्यंत वाढवला आहे.कोट्यावधी ग्राहक विना रिचार्ज करता इनकमिंग कॉलची सुविधा घेऊ शकतील.याशिवाय त्यांना १० रुपये अतिरिक्त टॉकटाईम मोफत मिळेल.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या