मंगलदास बांदल उपचारासाठी ससूनमध्ये दाखल...

Image may contain: 1 person, closeup
पुणे,ता.१ एप्रिल २०२० (प्रतिनिधी): सराफाचे छायाचित्रण व्हायरल करण्याची धमकी देत ५० कोटीची खंडणी मागितल्या प्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादीचे निलंबित नेते मंगलदास बांदल यांची अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना ससून रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बुधवारी (ता. १) पोलिस कोठडी संपणार असल्याने मंगळवारी नियमितपणे होणाऱ्या वैद्यकीय तपासणीसाठी बांदल यांस ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर डॉक्टरांनी बांदल यांस घशात त्रास होत असल्याचे कारण पुढे करून उपचारासाठी  रुग्णालयात दाखल करून घेतले आहे.


याप्रकरणी लक्ष्मी रस्त्यावरील प्रसिद्ध सराफी व्यावसायिकाने दत्तवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. सराफी व्यावसायिकाकडे ५० कोटी रुपयांची  खंडणी मागितल्याप्रकरणी बांदल यास पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ व खंडणी विरोधी विभागाने अटक केली होती. बांदलसह आशिष हरिश्चंद्र पवार (वय-२७), रूपेश ज्ञानोबा चौधरी (वय-४५), रमेश रामचंद्र पवार (वय-३२), संदेश वाडेकर यांनी अटक करण्यात आली होती.त्यानंतर बांदल यास न्यायालयाने १ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला होता.बांदल यांनी फिर्यादी सराफाला फोन करुन भेटण्यासाठी बोलावले होते. त्या वेळी रुपेश चौधरी हा त्यांच्यासोबत होता. बांदल यांनी सराफाला तुमच्या जवळचे लोकच तुम्हाला त्रासदायक ठरणार आहेत. म्हणून येथून पुढे काही असेल, तर रुपेश चौधरीच माझ्यावतीने काम पाहील, अशी ओळख त्या सराफ व्यावसायिकाला करुन दिली होती. त्यानंतर सराफाला भेटलेला आशिष पवार हा रुपेश चौधरीच्या नावाने सराफाकडे खंडणीची मागणी करत होता.आता पर्यंत करण्यात आलेल्या तपासात अशिष पवार याच्याकडून गुन्हात वापरलेले पिस्तुल, १२ काडतुस, एक मॅकझिन आणि सराफाच्या नातेवाईकांच्या नावाची यादी असे जप्त करण्यात आले आहे. रमेश पवार यांच्याकडून वापरण्यात आलेली मेमरी जप्त करण्यात आली आहे. संदेश वाडकर आणि रुपेश चौधरी या दोघांचा या गुन्हयात जामीन फेटाळण्यात आला आहे. फिर्यादी च्या वतीने पुष्कर दुर्गे यांनी काम पाहिले.


बांदल यांना १ एप्रिल पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र, त्यापूर्वीच ३१ मार्च रोजी त्यांना नियमित तपासणीसाठी ससून रुग्णालयात नेण्यात आले होते. यावेळी त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना भरती करण्यात आले आहे. ससून मधील शैल्यचिकित्सक यांच्या अहवालानंतर तपास अधिकार्‍यांनी बांदल यांना न्यायालयात हजर करावे असा आदेश दिला आहे. याविषयी अंमली पदार्थ व खंडणी विरोधी विभागाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते म्हणाले, "बांदल यांस नियमित वैद्यकीय तपासणीसाठी ससूनमध्ये नेले होते. त्यावेळी डॉक्टरांनी त्यास घशात त्रास होत असल्याने उपचारासाठी दाखल केले आहे. त्यांनी सोडल्यानंतर त्यास न्यायालयात हजर केले जाईल."


No photo description available.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या