शिक्रापूर पोलिसांनी दोन किमी पाठलाग केला अन्...

शिक्रापूर, ता. 3 एप्रिल 2020 (PoliceKaka): देशात कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन असतानाही अनेकजण नियमांचे उल्लंघन करताना दिसतात. पण, या काळात पोलिस डोळ्यात तेल घालून नागरिकांचे संरक्षण करताना दिसत आहेत.

देशात संचारबंदी असतानाही दारूची वाहतूक होत असल्याचे आढळून आल्याने शिक्रापूर पोलिसांनी दारूची वाहतूक करणाऱ्या युवकाला तब्बल दोन किलोमीटर पाठलाग करून अटक केली. ही घटना गुरूवारी (ता. 2) पहाटेच्या सुमारास घडली.जॉनी सुरेश कंजारभट असे अटक करण्यात आलेल्या नागरिकाचे नाव आहे. याबाबत पोलिस नाईक हेमंत पांडुरंग इनामे यांनी फिर्याद दिली आहे. चाकण चौकात नाकाबंदी करीत असताना एक दुचाकीस्वार दोन काळे ड्रम घेऊन भरधाव वेगाने निघाला होता, त्यावेळी पोलिसांनी त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो पुण्याच्या दिशेने पळून गेल्याने पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरू केला. यावेळी दोन किलोमीटर अंतर गेल्यावर दुचाकीवरील युवक दुचाकी घसल्याने खाली पडल्याने त्याला ताब्यात घेतले. पुढील तपास पोलिस करीत आहेत.Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या