शिरुरमध्ये लॉक डाऊनचा फज्जा;प्रशासन हतबल...

Image may contain: one or more people, fruit, outdoor and food
शिरुर, ता. ३ एप्रिल २०२० (मुकुंद ढोबळे): कोरोना व्हायरस आजाराचा संसर्ग होऊ नये म्हणून शिरूर शहरासह संपूर्ण देशात लॉक डाऊन घोषणा केली असली तरी शिरूर शहरात मात्र या लॉक डाऊन चा बेजबाबदार नागरिकांमुळे फज्जा उडाला असल्याचे दिसून आले आहे.तर दोन व्यक्तींमध्ये १ मीटरचे अंतर ठेवले पाहिजे परंतु हा नियम भाजी बाजारात कुठेही पाळला जात नाही.याबाबत शिरुर नगर परिषद प्रशासन,तहसील प्रशासन व पोलीस प्रशासन यांनी बघ्याची भूमिका न घेता कडक भूमिका घेणे गरजेचे आहे.अनेक नागरिकांनी याबाबत पोलिस महसूल नगरपरिषद प्रशासनाकडे अनेक तक्रारी केल्या आहेत. परंतु या तक्रारीचे कुठेच निवारण होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे यामुळे भविष्यात त्याची मोठी किंमत शिरुर शहराला मोजावी लागणार आहे हे मात्र निश्चित...!


शिरूर शहरात कोरोना व्हायरस आजाराचा संसर्ग होऊ नये.यासाठी लॉक डाऊन असले तरी नागरीक मोठ्या प्रमाणात नागरिक भाजीपाला व जीवनावश्यक वस्तूंच्या नावाखाली फिरताना दिसत होते.जनता कर्फ्यूवेळी शिरुर शहरातील नागरीकांनी शिस्त पाळली पण आज मोठ्या प्रमाणात नागरिकांकडून बेशिस्तीचे दर्शन घडले.शिरूर शहरात मोठ्या प्रमाणात सकाळी बाजार समिती आवारा समोर शहरांतर्गत रस्त्यावर बाजार भरवण्यात आला होता.नगर परिषदेच्या वतीने सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत भाजी बाजार तसेच फळ बाजार येथील रयत शिक्षण शाळेच्या मैदानावर भरवण्याचे ठरले होते.नगरपरिषदेच्या प्रशासनाने मात्र पुन्हा एकदा यात बदल करुन शहरातील अनेक ठिकाणी बाजार भरवला आहे.त्यामुळे भाजी घेणारे ग्राहक संपूर्ण शहरातील भाजी दुकानांवर फिरून पुन्हा शाळेच्या मैदानावर जात आहे. या अगोदर रोज सकाळी 11 ते 2 हा तीन तास भाजीबाजार भरवण्यात येत होता परंतु नगरपालिका प्रशासनाने हा भाजी बाजार सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत वरून काय साध्य केले हेच कळत नाही. त्यात शहरातील अनेक ठिकाणी बाजार भरून ठेवला आहे त्यामुळे शिरूर शहरातील महिला पुरुष वृद्ध नागरिक तरुण मोठ्या प्रमाणात बाजाराच्या नावाखाली किराणामालाच्या नावाखाली औषधोपचार त्या नावाखाली दवाखान्याच्या नावाखाली घराबाहेर पडत आहेत.त्यामुळे एकुणच नागरिक कोरोना बाबतीत गंभीर नाहीत असंच म्हणावं लागेल.शहरातील अनेक नागरिक मॉर्निंग वॉक व सकाळी फिरण्याच्या नावाखाली गावांमध्ये उपनगरात फिरत असल्याचे दिसत आहे.याच सकाळच्या वेळी वृद्धांची संख्या जास्त असून वृद्धांनी या आजाराबाबत जागृत होणे गरजेचे आहे.येथील आपात्कालीन व्यवस्थापन ग्रुपच्या वतीने शिरुर नगर परिषद मंगल कार्यालय येथे रक्तदानाचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरामध्ये ७३ जणांनी रक्तदान केले.आपत्कालीन ग्रुपचे तुकाराम खोले,संतोष शितोळे,सागर पांढरकामे यांनी या रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.शिरूर शहरात शिरूर नगरपालिकेच्या वतीने सुरू असलेला भाजी बाजार ७ तासांचा केला असुन त्यात अनेक ठिकाणी नवीन भाजी विक्रेत्यांना बसण्यास जागा दिली आहे.त्यामुळे शिरूर शहरात गर्दी मोठ्या प्रमाणात वाढत आहे.शिरूर नगरपरिषदेने भाजीबाजार दूध डेरी मेडिकल इतर जीवनावश्यक वस्तू २ तासांच्या वर उघडे ठेवू नये.कारण नागरीकांची गर्दी होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.तसेच शिरुर शहरात चार चाकी वाहने फिरण्यास बंदी आणावी.कारण काही नागरीक विनाकारण चार चाकी वाहने घेऊन अनेकदां शहरातील अनेक भागात फिरताना आज दिसून आले आहेत.

No photo description available.

शहराच्या अनेक भागात बाजार समिती एसटी स्टँड समोर प्रत्येक मेडिकल समोर अनेक दुचाकी वाहने पार्किंग केलेली चे दिसून आले त्यामुळे शिरूर शहरात लॉक डाऊनचा फज्जा उडवला गेल्या असल्याचे चित्र दिसून आले.याबाबत शिरुर नगर परिषदेचे  मुख्याधिकारी महेश रोकडे म्हणाले शिरूर शाळा मैदान येथे सुरू असलेल्या बाजारात कोरोनाव्हायरस संदर्भात दिलेल्या सूचना मास्क न वापरणे सोशल डिस्टन्स न राखणे यासंदर्भात या बाजारातील अनेक विक्रेत्यांना नोटीसा काढल्या असून, दोन विक्रेत्यांचे कायमस्वरूपी विक्री न करण्याची कारवाई केली आहे.नियमांचे पालन न करणाऱ्या दुकानदारांवर यापुढे कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या