धक्कादायक! शिरूरमधून 10 तबलिगी पळाले...

शिरूर, ता. 3 एप्रिल 2020 (PoliceKaka): शिरूर भाजी बाजार येथील तबलिग समाजाच्या मस्जिदमध्ये (मकतब अरबी शिक्षण सेंटर) होम क्वारंटाइन करून ठेवलेले 10 जण पळून गेल्याचे उघडकीस आल्यानंतर शिरूर शहरात खळबळ उडाली आहे.


माज गुलफान कुरेशी, मो. अनस मो. इस्माईल, नसून अहमद शमीम इहमद, आदिल शम्शी अब्दुल गफार, मो. अशहर मो. इद्रिस, मो. इकबाल इहमद चौधरी सिंकदर अली, मो. शहेद मो. इद्रीस, अब्दुला अफजल अन्सारी, अब्दुल रहेमान अब्दुल खालीक, शुमान जावेद खान (सर्व रा. आझाद मार्केट दिल्ली) अशी पळून गेलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरूर भाजी बाजार येथे तबलिगी समाजाची मस्जिद (मकतब अरबी शिक्षण सेंटर) आहे. दोन दिवसांपूर्वी ज्येष्ठ कॉंग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी एका मुलाखतीत शिरूरला काही तबलगी नागरिक यांनी आम्हाला सोडण्याची व्यवस्था करा, असा फोन केल्याचे सांगितले होते. हे कळल्यावर शिरूर नगरपरिषद व ग्रामीण रुग्णालय यांनी त्या मस्जिदमध्ये जाऊन दहा लोकांच्या हातावर 1 एप्रिल रोजी होम क्वारंटाइनचे शिक्के मारून तेथेच त्यांना होम क्वारनटाईन केले होते. हातावर शिक्के मारले असतानाही हे दहा लोक गुपचूप पळून गेले आहेत. हे सर्वजण एक टाटा कंपनीच्या ट्रक गुड्‌स कॅरिअर मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोतून पळून गेले असल्याचे समजते. ही माहिती मिळाल्यावर शिरूर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. हे लोक कोठे पळून गेलेत याची सखोल चौकशी सुरू आहे.
शिरूर येथील अरबी शिक्षण सेंटर येथे तबलिगी समाजाच्या प्रचारासाठी आलेले दिल्लीचे 10 नागरिक यांना दिल्लीला पाठवण्यासाठी व ते शिरूरला असल्याबाबत कॉंग्रेस नेते हुसेन दलवाई, जिल्हाधिकारी पुणे, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, तहसीलदार लैला शेख, पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे या सर्वांशी संपर्क साधला होता व त्याची माहिती दिली होती. या सर्व नागरिकांना दिल्ली येथे पाठवण्यासाठी पास देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी सर्वांकडे केली होती; परंतु ती मिळाली नाही. त्यातील काही जणांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असल्याने त्यांच्या गाड्या शिरूरवरून जात असताना त्या गाड्यांमध्ये ते दिल्ली येथे ते पोहोचले आहेत, असे अबिद शेख, हाफिज बागवान (विश्वस्त, मकतब अरबी शिक्षण संस्था) यांनी सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या