शिरूरमध्ये 'होम क्‍वारंटाइन'चे शिक्‍के मारलेले दिसले तर...शिरूर, ता. 4 एप्रिल 2020: कोरोना व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातला असून, देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. शिरूर शहरत 390 जणांना होम क्‍वारंटाइन केले असून, त्यांच्या घरांवर होम क्‍वारंटाइनचे स्टिकर लावले आहे. शहरातील 70 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या ज्येष्ठाचाही यात समावेश आहे.
या नागरिकांच्या हातावर 'होम क्‍वारंटाइन'चे शिक्‍के मारले आहे. जर हातावर शिक्‍का असलेला नागरिक कुठे फिरताना दिसले तर त्याची माहिती त्वरित नगरपरिषदेला कळवावी, असे आवाहन मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी केले आहे.

शिरूर शहरात नगर परिषदेच्या वतीने वेगवेगळ्या ठिकाणी आलेले परदेशातून व परराज्यातून व दुसऱ्या महानगरातून आलेल्या लोकांची पाहणी करण्यासाठी सात ग्रुप बनवले असून, प्रत्येक ग्रुपमध्ये तीन ते चार कर्मचाऱ्यांचा समावेश केला आहे. शिरूर शहरात थायलॅंड, युएई, इंग्लंड, युरोप, रशिया या ठिकाणी शिक्षण व कामासाठी गेलेले 11 नागरिक पुन्हा शिरूर शहरात आल्याने त्यांना होम क्‍वारंटाइन केले आहे.


राज्यातील पुणे, मुंबई, इतर राज्यातून आलेले 379 असे 390 जणांना होम क्‍वारंटइन केले आहे. होम क्‍वारंटाइन नियमाचा भंग जर नागरिकांनी केला तर त्यांवर गुन्हे दाखल करून त्यांच्यासाठी सिटी बोरा कॉलेज येथील हॉस्टेल येथे स्वतंत्र होम क्‍वारंटाइन केले जाणार आहे. मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांवरही गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी रोकडे यांनी सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या