पोलीस मित्र मदतीला धावले आणि औषधे पोहोच झाली...

Image may contain: 2 people, including Laxman Deokar, outdoor
शिरूर, ता.६ एप्रिल २०२० (तेजस फडके): सध्या सर्वत्र कोरोना व्हायरसचा धुमाकूळ सुरू आहे.त्यामुळे लॉकडाऊन सुरु आहे.पुण्यात कोरोनाचे रुग्ण आढळल्यामुळे पुर्ण संचारबंदी लागू झाली.शिरुर शहरात जोशीवाडी येथे राहणाऱ्या विमल घावटे यांची आयुर्वेदीक ट्रीटमेंट पुण्यात डॉ.मनीषा राजेभोसले यांच्या दवाखान्यात सुरू होती.सगळ बंद होणार म्हणून संदीप घावटे यांनी १५ मार्च ला औषधे कुरीअरने मागवले.पण नंतर कुरीअर  सेवा बंद झाली.आता भितीमुळे औषधे आणायला त्यांना पुण्यातही जाता येईना व औषधे तर संपली होती.


पुण्यात जाण्याच ठरल तर पोलीसांना दाखवायचे काय कारण फाईल हॉस्पीटलमध्येच ठेवतात.विचारचक्राने गती घेतली पण काय कराव हे घावटे यांना सुचत नव्हते.त्यांनी मित्र योगेश गुंजाळ व दिलीप नरके यांच्याशी या विषयावर चर्चा करताना कळले की पुण्यात पोलीस असणारे भाऊसाहेब बनकर एक दिवसाच्या सुटीवर आलेले होते.काही करून दवाखान्यात जा आणि औषधे ताब्यात घे अशी विनंती संदीप घावटे यांनी मित्राला केली.त्यांनी व त्यांचा मित्र पोलीस सागर रासकर यांनी हॉस्पीटल गाठले आणि औषधे घेतली.तेव्हा कुठे कुटुंबीयांच्या जिवात जीव आला.त्यानंतर पोलीस सागर रासकर यांनी ती औषधे थेट शिरुर येथे पोहोच केली त्यामुळे आईचा वाढणारा त्रास वाचला अशी भावना संदीप घावटे यांनी व्यक्त केली.तसेच  पुणे पोलीस दलात काम करणाऱ्या भाऊसाहेब बनकर (रा.देवदैठण,ता.श्रीगोंदा) आणि सागर रासकर (रा.सांगवी सूर्या,ता.पारनेर) या दोन्ही पोलीस मित्रांचे आभार मानले आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या