कोरोनासे कई ज्यादा इन्सानियतने मारा...

Image may contain: plant
सादलगाव, दिं, ७ एप्रिल २०२० (संपत कारकूड) : कोरोनाने सगळीकडे हाहाकर माजविला असताना याच संधीचा फायदा काही अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूच्या ठोक व किरकोळ विक्रेत्यांनी सगळीकडे नफाखोरी चालविली आहे.सगळ्याच वस्तूंची विक्री चढ्या भावाने केली जात आहे.जगाचा पोशिंदाच आज घरामध्ये बंद आहे.गरीब लोक यामध्ये भरडले जात आहे.ग्रामीण भागात प्रशासकीय यंत्रणा फक्त आणि फक्त कोरोनावर लक्ष केंद्रित करत आहेत.लॉक डाऊनमुळे किमान जिवंत राहणेसाठी घरात असलेले अन्न किती दिवस पुरेल...? 


रोजंदारीवर कामं करून उदरनिर्वाह करणारा मोठा वर्ग हवालदिल झाला आहे.जवळचे पैसे व घरातील शिधा संपल्यानंतर सामान्य नागरिकाला जगणे मुश्किल होणार आहे.सध्या १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन असल्यामुळे सर्वच जीवनावश्यक गोष्टींवर परिणाम होणार आहे. प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी ओळखून देशाला संकटातून वाचविण्याची गरज आहे.हे संकट केवळ आपल्यावर नाही तर सर्व जगावर आले आहे.दिवसेंदिवस हा धोका वाढत असुन त्याने आता अनेक लोकांना आपल्या मिठीत घ्यायला सुरवात केली आहे.


आपण जर वेळीच सावध नाही झालो तर आपण आपल्याच हातानी नष्ट होणार आहे.सर्वात मोठ संकट येण्याअगोदर आपण गंभीर घेऊन सरकारी आदेश पाळण्याची गरज आहे.कोरोनावर अजुनही कोणतच औषध नाही.यावर एकच इलाज म्हणजे मृत्यू.नियम पाळणे हे आपले राष्टीय कर्तव्य आहे.कारण याचे उदाहरण म्हणजे चीनमध्ये  प्रथम करोनाची सुरवात झाली आणि या देशाने यावर जवळपास मातसुद्धा केली.शिरुर तालुक्यात सगळीकडे लॉकडाऊन... 
देशभर कोरोनाचा विळखा वाढत असताना ग्रामीण भागामध्ये  प्रत्येक ग्रामपंचायतने सरकारी आदेशाप्रमाणे गाव बंद ठेवली आहेत.शिरूर पूर्व भागातील अनेक  गावांनी गावातील सगळे व्यवहार बंद ठेवले होते.अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने आणि इतर दैनंदिन सर्व व्यवहार बंद आहेत.शिरुरच्या ग्रामीण भागामध्ये अजुन कोरोनाने शिरकाव केला नसला तरी ग्रामपंचात,गावकरी व इतर स्थानिक नागरिक जास्त काळजी घेताना दिसत आहे.

ग्रामीण भागात लोकांना गांभीर्य नाही...
आपल्या गावात कोरोनाचे संकट नको,आले तर मरावे लागेल या भीतीनं नागरीक गावात फक्त चर्चा करतात.परंतु नागरिक  स्वतः नियम  पाळताना दिसत नाहीत .सोशल  डिस्टनशींग म्हणजे नेमके काय...? हेच अद्याप अडाणी नागरिकांना माहित नाही.हे संकट आपल्या गावच्या शिवेवर आले असुन अधिक जागरूक राहून  दक्षता घेण्याची वेळ असताना आजही काही नागरिक मात्र बँक,किराणा दुकाने,हॉस्पिटल,भाजीपाला विक्री केंद्रावरील  नियम कटाक्षाने पाळत नसलेचे दिसून येते.यावर कोणाचीच नजर नाही.दिवसातून एखाद्या वेळेस फक्त पोलीस पेट्रोलिंग होत असून सध्यापेक्षा अधिक कडक अंमलबजावनी होणे आवश्यक आहे.

No photo description available.
 

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या