शिरूर तालुक्यात चढ्या भावाने मालांची विक्री...

Image may contain: text
शिरूर, ता. 8 एप्रिल 2020 (तेजस फडके): जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 21 दिवसांसाठी लॉकडाऊनची घोषणा केली. मात्र, लॉकडाऊनच्या काळामध्ये शिरूर तालुक्यात किराणा दुकानदारांकडून चढ्या भावाने विक्री होत असल्याचे नेटिझन्स सांगतात.


लॉकडाऊनमुळे नागरिकांना घरामध्येच बसावे लागत आहेत. अनेकांचे हातावरचे पोट आहे. या काळामध्ये सामाजिक संस्था, नागरिक पुढे येऊन मदत करताना दिसतात. मात्र, दुसरीकडे किराणा दुकानदार चढ्या भावाने मालाची विक्री करत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत.


शिरूर तालुक्यात आघाडीवर असलेल्या www.shirurtaluka.com ने फेसबुक पेजवर 'शिरूर तालुक्‍यात किराणा दुकानदारांकडून चढ्या भावाने मालाची विक्री होत आहे काय?' अशी मतचाचणी घेतली होती. नेटिझन्सने आपले मत नोंदवताना 89 टक्के जणांनी होय तर 11 टक्के जणांनी नाही असे मत नोंदवले आहे. यावरून काही ठिकाणी चढ्या दराने मालाची विक्री होत असल्याचे दिसत आहे.


लॉकडाऊनमुळे यंत्रणा बंद असल्यामुळे काही प्रमाणात दरवाढ करणे योग्य आहे. पण, नागरिकांना वेठीस धरून जास्त दर घेणे योग्य नाही. शिरू तालुक्यात चढ्या भावाने मालाची विक्री करणाऱया दुकांनदारांवर प्रशासन काय कारवाई करणार, हे पुढील काळात पाहणे योग्य ठरेल.

दरम्यान, प्रत्येक ठिकाणी एकसारखीच परिस्थिती असेल असेही नाही. अनेक दुकानदार माणुसकी दाखवत आहेत. याबाबत तुम्हाला काय वाटते? तुमचा काय अनुभव आहे, याबाबत जरूर प्रतिक्रिया नोंदवा.Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या