शिरूरमधील 'येथील' भाजीबाजार बंद...

शिरूर, ता. 9 एप्रिल 202: शिरूर शाळा मैदानावर भरत असलेला रोजचा बाजार बंद करण्यात आला आहे, अशी माहिती शिरूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली. या ठिकाणी बसणारे भाजी विक्रेते यांना वॉर्डनिहाय भाजी विक्री करण्यासाठी लवकरच जागा उपलब्ध करून दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले.


लॉकडाऊन झाल्यापासून शिरूर शहरांमध्ये अहोरात्र काम करणारे सफाई कर्मचारी व इतर कर्मचारी यांची बुधवारी (ता. 8) शिरूर ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने वैद्यकीय तपासणी करण्यात आली.लॉकडाऊन झाल्यापासून शिरूर नगरपरिषदेचे वतीने रयत शाळा मैदान येथे भाजीबाजार भरवण्यात आला; परंतु येथे मोठ्या प्रमाणात नागरिक गर्दी करत आहे, तर येथे येणारे नागरिक व विक्रेते यांनी सोशल डिस्टन्सिंग पाळली नाही. अनेकवेळा सांगून यांनी दुर्लक्ष केले असल्याने अखेर हा भाजी बाजार व फळ बाजार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दररोज होणारी गर्दी पाहता रयत मैदानावरील भाजी बाजार आजपासून बंद करण्यात येणार आहे. तेथील भाजी विक्रेत्यांना वॉर्डमध्ये जागा देण्यात येत आहे. शिरूर शहर केमिस्ट असोसिएशन व डॉ. संदीप परदेशी यांच्यावतीने सर्व कर्मचाऱ्यांना मोफत औषधे उपलब्ध करून दिली.भाजीविक्रेत्यांनी भाजी विकताना ग्राहक गर्दी करणार नाहीत व सर्वजण 1 मीटर या सुरक्षित अंतरात थांबतील याची दक्षता घ्यावी. हे होत नसल्यास आपला भाजी विक्री परवाना रद्द करणेत येईल. वॉर्ड निहाय भाजी विक्रीतही एक मीटर अंतर न ठेवल्यास शिरूर शहरातील भाजीबाजार पूर्णतः बंद करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असेही महेश रोकडे यांनी सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या