सणसवाडीतील 'त्या' रुग्णाचा अहवाल आला हाती...

सणसवाडी, ता. 10 एप्रिल 2020: सणसवाडी (ता. शिरूर) येथील एका रुगणाचा अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रज्ञा घोरपडे यांनी दिली. सध्या तो रुग्ण पुणे येथील खासगी रुगणालयात उपचार घेत आहे.

लोणावळा येथील टोल नाक्यावर असलेला कर्मचारी सणसवाडी येथे गावी आल्यानंतर तळेगाव-शिक्रापूर रस्त्यावर १८ मार्च रोजी त्याचा अपघात होऊन पायाला इजा झाली होती. नंतर शिक्रापूर येथील दोन खासगी दवाखान्यात त्याने उपचार घेतले. तेथून त्याने वाघोली येथील दवाखान्यात उपचार घेतले, त्यानंतर पुणे येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचार घेताना त्या रुग्णाला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. उपचारानंतर सदर रुग्णाची चाचणी निगेटिव्ह आल्याचे डॉ. घोरपडे यांनी सांगितले.


दरम्यान, सदर रुग्णाने उपचार घेतलेल्या शिक्रापूर येथील दोन्ही खासगी दवाखान्यातील डॉक्टर, कर्मचारी व रुग्णाच्या नातेवाइकांची चाचणी केली असता कोणालाही कोरोनाचा संसर्ग झाला नसल्याचेही डॉ. घोरपडे यांनी सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या