स्विप्ट मोटारीत पोलिस अन् मोटार जोरात पळाली अन्...

Image may contain: car and outdoor
नारायणगाव, ता. 13 एप्रिल 2020 : नारायणगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीररीत्या गुटख्याची वाहतूक केल्याप्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्यासह अन्य व्यक्तीला रविवारी (ता. 12) अटक करून त्यांचे कडून ३० हजाराचा गुटखा, तंबाखू आणि ३ लाख ५० हजार रुपये किमतीची स्विफ्ट मोटारीसह ३ लाख ८० हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. संबंधित पोलिसाला निलंबित करण्यात आले आहे.

पोलिस पदाचा गैरवापर करून ड्रेसवरच गुटखा वाहतूक करणारा पोलिस आरोपी असल्याचे स्पष्ट झाल्याने पुणे ग्रामीण पोलिस दलात खळबळ उडाली आहे. पोलिस धवडे हा शिरूर पोलिस ठाण्यात रात्र गस्तीवर नेमणुकीस होता, असे ही तपासात उघड झाले आहे. पोलिस कॉन्स्टेबल किशोर ज्ञानदेव धवडे , बक्कल नं ११३९ , शिरुर पोलिस ठाणे व हनिफ इंब्राहमभाई तांबोळी (वय ५७,  रा. शिरूर भाजीबाजार, ता. शिरुर जि. पुणे) या दोघांवर भा.दं.वि. २७२, २७३,१६८,१८८,२६९,२७० व कोविड १९ उपाय योजना २०२० नियमानुसार , साथीचे रोग प्रतिबंधक का १८९७ क २,३,४ तसेच आप्पती व्यवस्थापन २००५ ,५१/२ आणि अन्नसुरक्षा आधिनियम २००६ क २६ (२), २६ (४) ३० (२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मांजरवाडीचे पोलिस पाटील सचिन किसन टाव्हरे यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी आळेफाटा येथील गुटखा विक्रेता इरफान मोमीन याला अटक करण्यात आली आहे. या सर्वाना जुन्नर न्यायालयात हजर केले असता या सर्व आरोपींना जामीन मंजूर केला.याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, मांजरवाडी हद्दीत नाकाबंदी करून चेकपोस्ट तयार करण्यात आले आहे, या चेकपोस्टवर पोलिस पाटील सचिन किसन टाव्हरे कृषी अधिकारी खेडकर, एसटी महामंडळाचे संतोष रोकडे, गजानन रोकडे, वनविभागाचे दशरय डोके व होमगार्ड अक्षय मुळे हे कार्यरत होते. शुक्रावारी (ता. 10) रात्री १०.३० सुमारास जाधववाडी बाजूकडून एक लाल रंगाची विना नंबर प्लेट असलेली स्विफ्ट कार येताना दिसली म्हणून तिला थांबवली. या स्विफ्ट कार मध्ये मध्ये खाकी ड्रेस घातलेला एक पोलिस कर्मचारी व त्याच्या शेजारी एक मुस्लीम समाजाचा मौलाना बसलेला होता. त्यांना तुम्ही कोठे चालले आहेत असे विचारले असता त्यांनी आम्ही जेवण करण्यासाठी चाललो आहे ,असे सांगितले व ते नारायणगावच्या दिशेने निघून गेले. मात्र, ते जात असताना मौलाना यांच्याकडे पोलिस पाटलांनी पहिले असताना त्यांना संशय आला. त्यांनी हि बाब सहाय्यक पोलिस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांना दिली.


शनवारी (ता. 11) मध्यरात्री १२.३० सुमारास लाल स्वीफ्ट गाडी नारायणगाव बाजुने जोरात येताना दिसली. ती गाडी नारायणगाववरून मांजरवाडी मार्गे शिरूर कडे जात असताना मांजरवाडी येथे नाकाबंदी दरम्यान गाडीला थांबविण्याचा प्रयत्न केला असता पोलिस कॉन्स्टेबल किशोर धवडे याने गाडी न थांबविता जोराने जाधववाडी बाजूच्या रस्त्याचे दिशेने निघून गेले. पोलिस पाटील सचिन टाव्हरे यांनी तात्काळ पुढे काही ग्रामस्थांना मोबाईल वरून माहिती देऊन गाडीचा पाठलाग सुरु केला. ग्रामस्थांनी भरघाव वेगाने येणाऱ्या मोटारीला अडविण्यासाठी रस्त्यावर येऊन अखेर गाडीवर काठ्यांनी प्रहार करून मोटार थांबविली. त्याच दरम्यान नारायणगाव पोलिस ठाण्याचे पोलिस स्वप्नील लोहार, सातपुते, शेख यांनी दोघांना ताब्यात घेऊन गाडीची तपासणी केली असता गाडीच्या पाठीमागील बाजूमध्ये, हिरा पान, आर एम डि , सेंट तंबाखू , गाय छाप असे ३० हजार रुपये किमतीचा बेकायदेशीर गुटखा व तंबाखू असा मुद्देमाल आढळून आला. आळेफाटा येथील इरफान हमीद मोमीन (वय - ४१) हा गुटखा विक्री करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी पुढील तपास अर्जुन घोडे पाटील हे करीत आहे.दरम्यान, अवैध गुटखा प्रकरणात सहभागी असलेला शिरूर पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी किशोर ज्ञानदेव धवडे याला रविवारी (ता. 12) बडतर्फ केले असल्याची माहिती पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या