श्रीगोंद्याचा नवरा आणि शिरूर तालुक्यातील नवरी अन्...

शिरूर, ता. 13 एप्रिल 2020: कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे अनेकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अशीच एका समस्येची चर्चा परिसरात रंगली आहे. ती चर्चा म्हणजे विवाहाची.


कोरोनामुळे अनेक लग्नाळूंच्या स्वप्नांवर पाणी पडताना दिसत आहे. सगळीकडे लॉक डाऊन आणि संचार बंदी असल्या मूळे असच ठरलेलं लग्न पुढे ढकलावं लागल्याचं उदाहरण समोर आलं आहे.


नगर जिल्यातील श्रीगोंदा तालुक्यातील नवरी तर पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील नवरदेव. वधू आणि वर या दोघांचा जिल्हा वेगळा आहे. यामुळे विवाहाला परवानगी मिळत नाही. यामागील कारणही तसेच आहे. मर्यादित लोकांची परवानगी लग्नाला जरी असली तरी जिल्हा बंदी नियम आडवा येत आहे. यामुळे वधू-वरांचे लग्न पुढे ढकल्याशिवाय पर्याय उरला नाही. राज्य सरकार ने कडेकोट पणे जिल्हाबंदीचे आदेश दिले असल्यामूळे नगर जिल्ह्यातील लोकांना पुणे जिल्ह्यात जाण्यास बंदी आहे.

विवाह इच्छुकांना मोफत नाव नोंदणीसाठी संकेतस्थळ, करा क्लिक करा...


लग्न हे पुणे जिल्ह्यातिल शिरूर तालुक्यात असल्यामूळे जिल्हाबंदीचा अडसर आडवा आला आणि लग्नाचा दिवस उजाडला तरी लग्नाची तारीख पुढे ढकलण्यात आली. त्यामूळे नाराज झालेल्या वधू-वरांनी आता कोरोना विरोधातील लढाई जिंकली की मगच लग्न करण्याचे ठरवलं आहे.

दरम्यान, ग्रामीण भागात लॉकडाऊन असल्यामुळे मुलगी पाहण्याचे, कार्यक्रम ही पुढे ढकलण्यात येत आहेत. कोरोनामुळे राज्यात अनेकांचे विवाह पुढे ढकलण्यात आले आहेत तर काहींचे विवाह निवडक नागरिकांच्या उपस्थितीत पार पडत आहेत. यामुळे काही लग्नाळूंच्या स्पप्नांवर पाणी पडताना दिसत आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या