भारतात २४ तासात कोरोनाचे ६२० नवीन रुग्ण...

Image may contain: plant
नवी दिल्ली, १३ एप्रिल २०२० : जगभरात कोरोनाग्रस्तांचा आकडा हा १८ लाखांवर गेला असुन  १ लाख १४ हजार जणांनी जीव गमावला आहे. तसेच भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या ८ हजार ४४७ झाली असुन आतापर्यंत २७३ जणांनी यामध्ये जीव गमावला आहे.तर ७६५ रुग्ण बरे झाले आहेत.दरम्यान केंद्र सरकारने आपले मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना मंत्रालयात आपापले कामकाज संभाळण्याचे आदेश दिले आहेत.


आरोग्य मंत्रालयाच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार सकाळी ८ वाजेपर्यंत कोरोना विषाणूच्या एकूण ७ हजार ९८७ ऍक्टिव्ह केसेस भारतात आहेत.तर आतापर्यंत ८५७ लोकांनी यावर मात केली आहे किंवा त्यांना डिस्चार्ज दिलेला आहे. दरम्यान, केंद्र सरकारने काही मंत्री आणि अधिकाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आदेश दिले आहेत.ज्यांच्याकडे वाहने आहेत आणि दिल्ली परिसरात राहतात असे मंत्री आणि अधिका-यांना कार्यालयात येऊन काम करण्यास सांगितले आहे.

विवाह इच्छुकांना मोफत नाव नोंदणीसाठी संकेतस्थळ, खाली क्लिक करा...


भारतात सर्वाधिक कोरोना विषाणू बाधितांची संख्या ही महाराष्ट्रात आहे. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १९८२ वर पोहचली आहे. सध्या राज्यात १६१६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत २१७ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. रविवारी राज्यात २२ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.त्यात मुंबईचे १६, पुण्यातील ३, नवी मुंबईतील २ आणि सोलापूरच्या १ रुग्णाचा समावेश आहे.


No photo description available.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या