गांजा आणण्यासाठी व्यसनी तरुणांनी लढवली शक्कल...

Image may contain: one or more people and people standing
पुणे, १३ एप्रिल २०२० (प्रतिनिधी) : 'पुणे तिथे काय उणे...' असं उगाच म्हटलं जात नाही. त्यातच कोरोना व्हायरसचं महासंकट आल्यामुळे संचारबंदी लागू करण्यात आली आहे.पुण्यातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जास्त असल्यामुळे कडकडीत बंद आहे.पण अशाही परिस्थितीत व्यसनाच्या आहारी गेलेले महाभाग काय शक्कल लढवतील याचा नेम नाही.३० एप्रिलपर्यंत लॉकडाउन असल्यामुळे व्यसनाच्या आहारी गेलेल्या लोकांची पुरते हाल झाले आहेत.

लॉकडाउन असल्यामुळे जीवनावश्यक वस्तू वगळता सर्वच बाजारपेठा बंद आहेत.अशाही परिस्थितीत काही महाभाग वेगवेगळ्या शक्कल लढवून आपली सोय करत आहेत.अशातच दोन तरुणांनी गांजा घेण्यासाठी जो काही प्रताप केला तो ऐकून पोलीसही हैराण झाले.हे पट्ठे चक्क पुणे महानगर पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्याचे कपडे घालून गांजा आणायला निघाले होते.पण, पोलिसांच्या तावडीत सापडल्यावर या दोघांचीही चांगलीच नशा उतरली.खडकवासला पोलिसांनी या दोघांनी अटक केली आहे.

या दोन्ही तरुणांनी मृत असलेल्या महापालिकेच्या कर्मचाऱ्याचे कपडे घातलेले होते.या मृत कर्मचाऱ्याचे कपडे मापात बसत नव्हते म्हणून घरीच ते स्वत:च्या मापात अल्टर करून घेतले होते.त्याच्या सोबत असलेल्या दुसऱ्या तरुणानेही वाहतूक पोलीस कर्मचारी वापरत असलेल रेडियमचं जॅकेट घातलेलं होतं.
मात्र, खडकवासला नाक्यावर बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांना या दोन्ही बहाद्दुरांचा संशय आला. त्यांनी या दोन्ही तरुणांची चौकशी केल्यावर त्यांनी दिलेली उत्तर ऐकून पोलीसही हैराण झाली.

या तरुणांनी एका मृत कर्मचाऱ्याचा ड्रेस चोरला होता. तिथेच या दोघांना वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याच रेडियमच जॅकेटही सापडला होता.या दोन्ही तरुणांसोबत आणखी काही तरुण आहे. त्यांनी सर्वांनी मिळून पैसे गोळा केले होते.या पैशातून हे दोन भामटे मृत कर्मचाऱ्याचा ड्रेस घालून गांजा आणत होते. पण, आज पोलिसांच्या तावडीत सापडल्यानंतर दोघांनी आपल्या कृत्याची उघडपणे कबुली दिली.पोलिसांनी या दोघांनाही अटक केली असून इतर आरोपींचा शोध घेत आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या