"कोरोना" च्या संशयातून मदत नाकारल्याने एकाचा मृत्यू

Image may contain: one or more people and text
मुंबई,ता. १३ एप्रिल २०२० (प्रतिनिधी): कोरोनाच्या संकटकाळात सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचं आवाहन वारंवार केलं जात असलं, तरी मुंबईत असंवेदनशीलतेचा कळस दाखवणारा प्रकार समोर आला आहे.हार्ट अटॅक आलेल्या वृद्धाला 'कोरोना' झाल्याच्या संशयातून शेजाऱ्यांनी त्याला मदत नाकारली.त्यामुळे वृद्धाचा मृत्यू झाल्याची हृदय हेलावणारी घटना समोर आली आहे.


चेंबूरमध्ये राहणाऱ्या समीर रविंद्र नासकर यांना १० एप्रिल रोजी संध्याकाळी हृदयविकाराचा धक्का आला.घरात त्यांची पत्नी आणि मुलगी दोघीच होत्या. ६१ वर्षीय पित्याला रुग्णालयात नेण्यासाठी मायलेकींनी धावाधाव सुरु केली.शेजाऱ्यांची बेल दाबून त्यांनी मदतीची याचना केली.नासकर यांना 'कोरोना' झाल्याच्या संशयातून शेजाऱ्यांनी रुग्णालयात नेण्यास नकार दिला.त्यामुळे रुग्णवाहिका येण्यास उशीर झाला.वेळेत उपचार न मिळाल्याने समीर नासकर यांनी रुग्णालयात प्राण सोडले.

विवाह इच्छुकांना मोफत नाव नोंदणीसाठी संकेतस्थळ, खाली क्लिक करा...नासकर मायलेकींच्या दुर्दैवाची कहाणी इथेच संपली नाही.समीर नासकर यांचा मृतदेह पुन्हा घरी आणण्यात आला. मात्र त्यानंतरही शेजाऱ्यांनी माणुसकी सोडली.कोरोनाच्या भीतीपोटी त्यांनी अंत्यसंस्काराला मदत करण्यास नकार दिला.पित्याच्या निधनानंतर मायलेकीना शेजाऱ्यांनी वाऱ्यावर सोडलं.लॉकडाऊन असल्यामुळे त्यांचे नातेवाईकही येऊ शकले नाहीत.अखेर पित्याच्या मृतदेहाला आई सविता नासकर आणि मुलगी मोनिका नासकर यांनीच १ किलोमीटरपर्यंत खांदा दिला.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या