Video: शिक्रापूरला एन्काई कंपनीत आग

शिक्रापूर, ता. 14 एप्रिल 2020: येथील एन्काई कंपनीत सोमवारी (ता. 13) दुपारी एकच्या सुमारास शॉटसर्किटमुळे आग लागून साधारण दहा ते पंधरा लाखांच्या भंगार सामानाचे नुकसान झाले. सुदैवाने या दुर्घटनेत कुठली जिवीतहानी झाली नाही. केवळ स्क्रॅप जळाल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली.

एन्काई कंपनीत दुपारी अचानक आग लागल्याचे सुरक्षा कर्मचा-यांच्या निदर्शनास आले. त्यांनी शिक्रापूर पोलिसांसह कंपनी व्यवस्थापनास ही बाब कळविताच काही स्थानिक पाण्याचे टॅंकर घटनास्थळी पोचले. कंपनीच्या शेजारीच असलेल्या अ‍ॅलिकॉन कंपनीचे अधिकारी व कर्मचा-यांसह सुरक्षारक्षक यांनी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. वाघोलीतून अग्निशमन दलाच्या काही गाड्या घटनास्थळी पोचल्यानंतर तासाभरात आग आटोक्यात आली. 

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या