विनापरवाना पेट्रोल विक्री केल्याने तिघांवर गुन्हा...

No photo description available.
शिरुर,ता.१४ एप्रिल २०२० (मुकुंद ढोबळे): वडगाव रासाई (ता.शिरुर) येथे विनापरवाना पेट्रोलची विक्री करणाऱ्या व विक्री करण्यासाठी पेट्रोल देणाऱ्या पेट्रोल पंप चालक व अन्य दोघांविरोधात शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे.संजय शिवाजी देशमुख (रा.वडगाव रासाई,ता.शिरुर) पेट्रोलपंप चालक रविंद्र लोखंडे व गणेश प्रभाकर वाघ दोघे (रा.रांजणगाव सांडस,ता.शिरुर) या तिघांवर शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना १० एप्रिल रोजी घडली होती.


याबाबत शिरुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे नायब तहसीलदार डि के यादव व पुरवठा निरीक्षक शहाजी राखुंडे यांना वडगाव रासाई (ता.शिरुर ) येथील संजय देशमुख चोरून पेट्रोलची विक्री करीत असल्याची माहिती मिळाली.त्यानंतर नायब तहसीलदार यादव पुरवठा निरीक्षक राखुंडे,कामगार तलाठी कोळपे ग्रामसेवक रासकर पोलिस कॉन्स्टेबल गुंड या पथकाने संजय देशमुख राहत असलेल्या घरी छापा टाकला.यावेळी संजय देशमुख हा शंभर रुपये लिटर दराने पेट्रोल विक्री करीत असल्याचे आढळून आले.त्याच्या घरी एका निळ्या ४० लिटरच्या कॅनमध्ये १५ लिटर पेट्रोल,५ लिटरचा कॅन त्याच्यात १ लिटर पेट्रोल, १ लिटर पेट्रोल भरलेली बाटली,बाटलीमध्ये भरलेले १ लिटर ऑईल, १ प्लास्टिकचे नरसाळे व मापा साठी प्लास्टिकचा जार,असा एकूण १ लाख ५ हजार रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे.यावेळेस आरोपी संजय देशमुख याला विचारले की हे पेट्रोल कुठून आले तर त्याने रांजणगाव सांडस येथील रवींद्र लोखंडे यांच्या पेट्रोल पंपा वरून आणले असल्याचे सांगितले.


याप्रकरणी संजय देशमुख,रवींद्र लोखंडे, गणेश वाघ या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पुरवठा निरीक्षक शहाजी राखूंडे यांनी फिर्याद दिली आहे.या तिघांवर अत्यावश्यक सेवेतील बाबींची जास्त दराने विक्री करण्यात आल्याने कायदा कलम १८८ नुसार शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रविण खानापुरे करीत आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या