पोलिस आल्याचे पाहून पळापळ झाली पण...

शिक्रापूर, ता. 15 एप्रिल 2020 (PoliceKaka): देशात लॉकडाऊन असताना काहीजण चक्क शाळेत जुगार खेळत होते. पोलिसांनी छापा टाकल्यानंतर त्यांची पळापळ झाली. पोलिसांनी 13 जणांवर गुन्हा दाखल करत चौघांना ताब्यात घेतले आहे.


जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असताना तो आटोक्यात आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. मात्र, अनेकजण या नियमांना हरताळ फासताना दिसत आहेत. कासारी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत जुगाराचा अड्डा तयार केला होता. याबाबतची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी छापा टाकला. पोलिस आल्याचे समजल्यानंतर पळापळ सुरू झाली. मात्र चौघांना ताब्यात घेत 13 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. शिवाय, त्यांनी तोंडाला मास्क किंवा रुमालही बांधला नसल्याचे आढळून आले आहे.


उमेश अशोक रासकर, सागर दीपक भुजबळ, नवनाथ लहानू काळकुटे असे ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर अतुल चंद्रकांत साबळे, प्रशांत जयसिंग सातपुते, अनिल सुदाम गोसावी, प्रदीप सुदाम गोसावी, सुनील वसंत गोसावी, काळूराम सीताराम काळकुटे, गुंडाराम सोपान सातपुते, शांताराम उर्फ लाला अशोक काकडे, अजित सुरेश साबळे, महादेव जयसिंग सातपुते (सर्व रा. कासारी ता. शिरूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिस नाईक हेमंत पांडुरंग इनामे (रा. शिक्रापूर) यांनी फिर्याद दिली आहे.शिक्रापूरचे पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राजेश माळी, दत्तात्रेय शिंदे, विलास आंबेकर, हेमंत इनामे, अविनाश पठारे यांनी कारवाई केली. घटनास्थळावरून दोन पत्त्यांचे बंडल, तीन मोबाईल, रोख 1200 रुपये जप्त करण्यात आले असून, पुढील तपास पोलिस करत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या