Video: टेम्पोच्या काचेवर अत्यावश्यक सेवेचा बोर्ड अन्...

यवत, ता. 15 एप्रिल 2020 (PoliceKaka): बारामती विभागाचे अप्पर पोलिस अधीक्षक जयंत मीना यांचे सूचनेनुसार कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने अपर पोलिस अधीक्षक कार्यालयातील अधिकारी आणि पोलिस जवान हे पेट्रोलिंग करत असताना वाहने चेकिंग दरम्यान Eicher टेम्पो च्या हालचालीबाबत संशय आल्याने सदर टेम्पोच्या पाटस टोल नाक्यापर्यंत हालचालींवर लक्ष ठेऊन पाटस टोल नाका येथे ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.


सदर गाडीत बिस्किटे आहेत असे कळविले. त्यास अधिक विचारपूस करून टेम्पो चेक केला असता टेम्पो मध्ये कोणाही चेकिंग करणाऱ्या पोलिसांच्या लक्षात येऊ नये अशा पद्धतीने आतील बाजूस गुटख्याची पोती भरून मागचे बाजूला बिस्कीट चे box भरलेले मिळून आले. सिकंदराबाद, तेलंगणा येथून पुण्याच्या दिशेने Eicher टेम्पो निघाला होता. सदर टेम्पोच्या काचेवर अत्यावश्यक सेवा असा छापील बोर्ड लावला होता.


संबंधित वाहन हे तेलंगणा येथून 540 km प्रवास करून आले. या कालावधी दरम्यान खूप मोठ्या प्रमाणात नाकाबंदी साठी असलेल्या पोलिसांना चुकीची माहिती देऊन फसवणूक करून एवढे मोठे अंतर पार करून आले. सदर संशयित आरोपींनी सदर वाहनाचा शासनाचा online pass सुद्धा प्राप्त करून घेतला होता. या प्रकरणी  मानसिंग खुदहरणसिंग कुशवाहा (वय 50 राहणार गाझीपुर उत्तर प्रदेश), शीलदेव कृष्ण रेड्डी (रा. सिकंदराबाद, हैदराबाद राज्य तेलंगणा) या दोघांना अटक करण्यात आली आहे. शिवाय, 22,27,500 रुपये किमतीचा सागर SGR - 2000 नावाचा गुटखा, 10 लाख रुपये किमतीची Eicher टेम्पो (TS10/UA608) असा एकूण 32,27,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपींविरोधात अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 व त्याखालील नियम 2011 अंतर्गत कलम 26(1) 26(2), 27(1)(2)(3),30(2)(a) भा द वि 420, 34, 177, 269, 270, 272, 273,188 साथीचे रोग प्रतिबंधक अधिनियम 1897 कलम 2,3,4 या प्रमाणे यवत पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कामगिरी अप्पर पोलिस अधीक्षक जयंत मीना यांचे मार्गदर्शनाखाली बारामती क्राईम ब्रँच चे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, यवत पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, बारामती क्राईम ब्रँच चे पोलिस जवान सुरेंद्र वाघ, संदीप जाधव, स्वप्निल अहिवळे, शर्मा पवार, विशाल जावळे, चालक रमेश मोरे तसेच यवत पोलिस स्टेशन चे पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ वाघमोडे, रामदास घाडगे पोलिस जवान संपत खबाले, रमेश कदम, जितेंद्र पानसरे, अजित काळे, प्रशांत कर्णवर यांनी केली.  पुढील तपास पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ वाघमोडे करत आहेत.Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या