शिरूरमधील 'या' दवाखान्यांत विनामूल्य उपचार...

शिरूर, ता. 16 एप्रिल 2020: शिरूर नगरपरिषदेने शहरात पाच ठिकाणी जनता दवाखाने सुरू केले आहेत. आरोग्य विभागाच्या सहकार्याने सुरू केलेल्या या दवाखान्यांत विनामूल्य उपचार होणार असून, औषधे मोफत दिली जाणार आहेत, अशी माहिती नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली.डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, सेंटर शाळा, नगर परिषद शाळा क्रमांक एक व पाच आणि मुंबई बाजारातील अंगणवाडी या ठिकाणी हे तात्पुरत्या स्वरूपाचे "कम्युनिटी हेल्थ क्‍लिनिक' (जनता दवाखाना) सुरू केले आहेत. किराणा माल दुकानदारांपैकी मालक - कामगार पुणे, नगर किंवा शिक्रापूर परिसरातून येथे येत - जात असतील ; तर त्यांची माहिती नगर परिषदेला तातडीने द्यावी. जेणेकरून त्यांच्या प्राथमिक तपासण्या करण्यात येतील, असे रोकडे यांनी सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या