महिलांनो तुम्ही घाबरू नका; प्रशासन काळजी घेतेय...

शिक्रापूर, ता. 17 एप्रिल 2020:  महिलांनो तुम्ही घाबरू नका, तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची पूर्ण काळजी प्रशासन घेत आहे, फक्‍त प्रशासनाला सहकार्य करा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

शिक्रापूर (ता. शिरूर) येथील एका सोनोग्राफी सेंटरमधील एका डॉक्‍टरला करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्या डॉक्‍टरच्या हॉस्पिटलमध्ये तपासणी केलेल्या तब्बल 144 गर्भवती महिलांना होम क्‍वारंटाइन करण्यात आले असताना त्यापैकी डॉक्‍टरने स्वतः तपासणी केलेल्या 69 गरोदर महिलांची स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.याच पार्श्‍वभूमीवर महिलांना धीर देण्यसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद व शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी बुधवारी (ता. 15) रात्री उशिरा या महिलांची भेट घेत चौकशी करून सुविधांची पाहणी केली. यावेळी विविध अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.यावेळी महिलांना क्‍वारंटाइन करण्यात आलेल्या सर्व हॉटेलची पाहणी करत तेथी सर्व सुविधांची माहिती आयुष प्रसाद व अशोक पवार यांनी घेतली. महिलांना सर्वोतोपरी सुविधा पुरविण्याबाबतचे तसेच तर गावामध्ये निर्जंतुकीकरण करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्या आदेश प्रशासन व अधिकाऱ्यांना दिले आहे. यावेळी बोलताना महिलांच्या तपासणीचे नमुने जलद गतीने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे पाठवा त्याचे अहवाल देखील जलद गतीने मिळविण्यासाठी प्रयत्न करू, असे आयुष प्रसाद यांनी सांगितले.

No photo description available.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या