मंगलदास बांदल यांना जामीन मंजूर...

Image may contain: one or more peopleपुणे, ता. 20 एप्रिल 2020 : पुण्यातील एका सराफ व्यावसायिकाला खंडणी मागण्याच्या एका प्रकरणात पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल यांना पुणे सत्र न्यायालयाने ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर शुक्रवारी (ता. 4) जामिन मंजूर केला. पर्यायाने २१ मार्च रोजी पोलिस कोठडी तर दि.६ एप्रिलपासून न्यायालयीन कोठडीत असलेल्या बांदलांना दिलासा मिळाला आहे.


पुण्यातील एका सराफ व्यावसायिकाला ५० कोटींची खंडणी मागण्याच्या एका प्रकरणात संबंधित व्यावसायिकाचा अंगरक्षक आशिष पवार, घरकाम करणारा रमेश पवार व रुपेश चौधरी यांना १६ मार्चला अटक करण्यात आली होती.


सदर व्यावसायिकाच्या फिर्यादीत बांदल यांचा उल्लेख झाल्याने त्यांना पुण्यातील दत्तवाडी पोलिसांनी चौकशीसाठी दोनदा बोलविले. दरम्यान फिर्यादीच्या जबाबातही बांदलांचा उल्लेख झाल्याने बांदल यांना दि.२१ मार्च रोजी अटक केली असता त्यांना पुणे सत्र न्यायालयाने १० दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पुढे १ एप्रिल रोजी पोलिस कोठडी संपण्याच्या दरम्यानच त्यांना घशाचा त्रास सुरू झाल्याने त्यांनी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुन्हा न्यायलयाने ६ एप्रिल रोजी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.


मात्र, रुग्णालयाच्या अहवालानंतरच त्यांची रवानगी येरवडा कारागृहात होणार होती. या सर्व घटनाक्रमाच्या पार्श्वभूमिवर ते सध्या ससुन रुग्णालयातच उपचारार्थ न्यायालयीन कोठडीत अटक असताना शुक्रवारी पुणे सत्र न्यायालयात त्यांच्या जामिनावरची सुनावणी झाली. यात पुण्यातील प्रसिध्द वकील अ‍ॅड.हर्षद निंबाळकर स्वत: उपस्थित राहून बांदल यांची बाजू मांडली असता त्यांना पुणे सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला.


दरम्यान या संपूर्ण प्रकरणाच्या पार्श्वभूमिवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपदी असलेल्या बांदलांना पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी १४ मार्च रोजी पक्षातून निलंबीत करीत असल्याचे पत्र जारी केले होते. पर्यायाने बांदल सध्या कुठल्याच पक्षात नसल्याने आणि त्यांच्या नैसर्गिक स्वभानुसार त्यांच्या आगामी राजकीय वाटचालीबद्दलही ते काय बोलतात याची उत्सूकता राहणार आहे. बांदल लवकरच या संपूर्ण प्रकरणाबाबत स्पष्टपणे बोलणारच आहेत.

No photo description available.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या