शिंदोडीत मासे विक्री बंद करण्याची मागणी...

Image may contain: outdoor and water
शिंदोडी, दि. २० (तेजस फडके): सध्या सगळ्या जगात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे.पुणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा ५०० च्या वर गेला आहे.शिरुर तालुक्यात आत्तापर्यंत २ रुग्ण सापडले आहेत.शिरुर तालुक्याच्या पुर्व भागात निमोणे,गुनाट,करडे,निर्वी सह अनेक गावात ग्रामस्थांनी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी कडक पाऊले उचलली आहेत.परंतु शिंदोडी(ता.शिरुर) येथे मात्र अजूनही काही जबाबदार राजकीय नेत्यांकडूनच शासनाच्या लॉक डाऊनला हरताळ फासला जात असल्याचे चित्र दिसत असल्याने ग्रामस्थ चिंताग्रस्त झाले आहेत.


शिंदोडी हे शिरुर पासुन सुमारे २२ किमी पूर्वेला घोड धरणाच्या कडेला वसलेल गाव.गावाच्या पुर्व,दक्षिण आणि उत्तर दिशेला घोड धरणाच पाणी असल्याने गावात येण्यासाठी फक्त पश्चिम दिशेकडूनच रस्ता आहे.शिंदोडी येथे येण्यासाठी गुनाट आणि निमोणे या दोनच गावावरुन रस्ता आहे.या दोन्ही गावचे रस्ते दत्तवाडी या ठिकाणी एकत्र मिळतात तिथच गावची शिव आहे.


फेब्रुवारी महिन्यानंतर घोड धरणातील पाण्याची पातळी खाली जाते.त्यानंतर शिंदोडी गावात मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जाते.यात काही स्थानिक मच्छिमार आहेत.सध्या ३ मे पर्यंत लॉकडाऊन असल्याने शिंदोडी येथे बाहेरच्या गावातील अनेक नागरीक मासे खरेदीसाठी येतात.परंतु त्यांना कोणीही अडवत नाहीत.तसेच मासे खरेदी करताना कोणताही सोशल डिस्टन्स पाळला जात नाही.त्यामुळे शिंदोडी गावात अनेक अफवांना ऊत आला असुन मासे खरेदी करणाऱ्या लोकांना प्रतिबंध घालावा अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.


शनिवारी (दि १९) रोजी सकाळी शिंदोडी गावात एक कोरोना बाधित येऊन गेल्याच्या अफवेमुळे नागरीक भयभीत झाले होते.गावात या गोष्टीची जोरदार चर्चा चालु होती.त्यानंतर गावात जाणारा मुख्य रस्ता बंद करण्यात आला.परंतु गावच्या ग्रामसेविका सुरेखा साबळे आणि पोलीस पाटील भास्कर ओव्हाळ यांना याबाबत विचारले असता त्यांनी हि अफवा असल्याचे सांगितले.तसेच अश्या अफवा पसरविणाऱ्या लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल होणं गरजेच असल्याचं मत व्यक्त केल.

एका व्यक्तीसाठी सर्व ग्रामस्थ वेठीस...
गावातील एका राजकीय पुढाऱ्यान घोड धरणातील मासेमारीचा ठेका घेतलेला असुन गावातच तो मासेविक्री करतो.त्यामुळं बाहेरचे अनेक लोक गावात येतात.त्यामुळे शिंदोडी गावात रोज वेगवेगळ्या अफवांना ऊत येत आहे.हि माशांची विक्री वेशीच्या बाहेर झाल्यास गावात बाहेरची लोक येणार नाहीत.त्यामुळे माशांची विक्री गावच्या वेशीच्या बाहेर करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.तसेच गावातील काही ग्रामस्थ शेजारील गावातील आपल्या पाहुण्यांना मासे खाण्यासाठी किंवा विकत घेऊन देण्यासाठी गावात बोलवत आहेत.हा प्रकारही थांबविण्यात यावा अशी संतप्त मागणी शिंदोडीतील ग्रामस्थांनी www.shirurtaluka.com शी बोलताना केली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या