निमोणे आयडॉल च्या वतीने गरजुंना किराणा वाटप...

Image may contain: plant
शिंदोडी, दि २१ (तेजस फडके): कोरोनाच्या पार्श्वभुमीवर ३ मे पर्यंत लॉकडाऊन असल्यामुळे मोलमजुरी करुन पोट भरणाऱ्या शेतमजुरांचे सध्या  मोठया प्रमाणावर हाल होत आहेत.अनेक ठिकाणी या मजुरांना दिलासा देण्यासाठी वेगवेगळ्या सामाजिक संस्था व व्यक्ति आज पुढे येत आहेत.त्यामुळे मजुरांच्या पोटापाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे.सोशल मिडियाच्या माध्यमातुन एकत्र आलेल्या "निमोणे आयडॉल्स" या व्हाट्स अँप गृपच्या सदस्यांनी सुध्दा गावातील गरजु आणि गरीब लोकांना मदत करुन या कोरोनाच्या संकटसमयी आपले कर्तव्य पार पाडले आहे.


निमोणे (ता.शिरुर) येथील "निमोणे आयडॉल्स व्हाट्स अँप" गृपच्या वतीने शिरुर पोलिस स्टेशनचे पोलीस निरिक्षक प्रविण खाणापुरे यांचे हस्ते गरजूंना किराणा मालाचे किट वाटण्यात आले.तसेच सध्या सर्वत्र कोरोनोचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस प्रशासन नेटाने लढाई लढत असुन नागरीकांच्या सुरक्षेसाठी रात्रंदिवस कर्तव्य बजावणारे शिरूर पोलीस व महसुल प्रशासन यांना मास्क प्रदान करण्यात आले.यावेळी नायब तहसिलदार यादव, शिरूर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय बारहाते,शिरूर शहराध्यक्ष दिपाली काळे,मदन काळे,ग्रामसेवक विकी पोळ उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या