गुनाट मध्ये जुगार खेळणाऱ्या १० जणांवर कारवाई

शिरुर, ता. २१ एप्रिल २०२० (प्रतिनिधी): संपुर्ण देशात ३ मे पर्यंत लॉकडाऊन असुन दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत.शिरुर तालुक्यात पोलिसांनी वेळोवेळी सर्वसामान्य लोकांना आवाहन करुनही काही लोक विनाकारण बाहेर फिरताना तसेच गर्दी करताना दिसत आहेत.त्यामुळे पोलिसांनी कडक कारवाई सुरु केली आहे.रविवार (दि १९) रोजी शिरुर पोलिसांना गुनाट (ता.शिरुर) येथे जुगार खेळताना १० जण सापडल्याने त्यांच्यावर कारवाई केली आहे. ४ दिवसांपुर्वी निमोणे येथे अशीच कारवाई केली होती.


रविवार(दि १९) रोजी शिरुर पोलिसांची गस्त चालु असताना गुनाट येथील खोकडमाळ येथे दुपारी ४ च्या सुमारास १० जण जुगार खेळत असल्याची माहीती पोलिसांना मिळाली त्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी धाड टाकली असता.जुगार खेळणारांची पळापळ झाली.त्यातील २ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.तसेच ३ मोटार सायकल सहीत रोख रक्कम मिळुन ३२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.या सर्व आरोपी  विरुद्ध भा द वि क १८८ अन्वये महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ महाराष्ट्र जुगार  कायदा कलम १२ (अ) राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम २००५ चे कलम ५१ ब भारतीय साथ रोग अधि १८९७ चे कलम २,३,४ प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.


आरोपींची नावे पुढीलप्रमाणे...
१) बबन सोनवणे २) हनुमंत मोरे ३) अनिल भालेराव  ४) रमेश गाडे ५) भाऊसाहेब शिंदे ६) बाबासाहेब वळू ७) सुरेश गाडे सर्व राहणार गुनाट तसेच दत्ता वाळुंज आणि इतर अनोळखी २ इसम पुढील तपास पोलीस नाईक थेऊरकर हे करीत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या