घोड धरणात २५ टक्के पाणीसाठा...

शिंदोडी, ता. २३ एप्रिल २०२० (तेजस फडके) : चिंचणी(ता. शिरुर) येथील ७ टी एम सी पाणी साठवण क्षमता असलेल्या घोड धरणात १.२ टी एम सी (२५ टक्के) राहिला असुन सध्या घोड धरणाच्या उजव्या कालव्याचे आवर्तन सुरु असुन हे आवर्तन २ दिवसात संपणार असल्याची माहीती घोडचे कनिष्ठ अभियंता किरण तळपे यांनी दिली.


घोड धरणाची एकुण पाणी साठवण क्षमता ६६.६८ दशलक्ष घनमीटर असुन,उपयुक्त पाणीसाठा ३५.३७ दशलक्ष घनमीटर तर मृत पाणीसाठा ३१.३१ दशलक्ष घनमीटर आहे.धरणाच्या डाव्या कालव्याचे उन्हाळी आवर्तन २५ एप्रिल पासुन सुरु होईल असा अंदाज आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या