शिंदोडी गावची सुरक्षा "राम" भरोसे...

Image may contain: plant
शिंदोडी,  ता. २३ एप्रिल २०२० (तेजस फडके): आपल्या देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असुन ग्रामीण भागातही कोरोनाचा संसर्ग वाढला आहे.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोरोनाच्या संकटापासुन देशाला तसेच राज्याला वाचविण्यासाठी प्रशासनाला वेळोवेळी सुचना देत आहेत.


शिरुर तालुक्यात अनेक ग्रामपंचायतीमध्ये स्वतः ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी राजकीय हेवेदावे विसरुन खांद्याला खांदा लावून काम करत आहेत.परंतु शिंदोडी येथील एका सदस्याचा अपवाद वगळता बाकीचे ग्रामपंचायत सदस्य गावावर संकट असताना दुर्लक्ष का...? करत आहेत असा प्रश्न येथील सामाजिक कार्यकर्ते पंढरीनाथ फडके यांनी केला आहे.


शिंदोडी हे अंदाजे २ हजार लोकसंख्येच गाव असुन शिंदोडी ग्रामपंचायत मध्ये ७ ग्रामपंचायत सदस्य आहेत.शिंदोडीत ३ वार्ड असुन गेल्या ५ वर्षात या ग्रामपंचायत सदस्यांनी किती वेळा स्वतःच्या वार्डात फिरुन सर्वसामान्य लोकांच्या समस्या जाणुन घेतल्या हा संशोधनाचा विषय आहे.सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना गावात बाहेरुन येणाऱ्या लोकांवर नियंत्रण राहिले नसुन भविष्यात जर यातुन कोरोना सारखी महामारी गावात आली तर त्याला जबाबदार कोण...? ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक आश्वासनं दिली जातात तसेच लाखो रुपये खर्च केले जातात.पण गावावर संकट आल्यावर मात्र गाव "रामभरोसे" सोडलं जातंय हिच मोठी शोकांतिका आहे.


शिंदोडी गावात फक्त एक दिवस लॉक डाऊन पाळण्यात आला.परंतु त्यानंतर गावात कोण येतय कोण जातय याची माहीती ठेवणारी यंत्रणा नाही.गावात येणारा  रस्ता आत्तापर्यंत ३ वेळा बाहेरच्या लोकांसाठी बंद करण्यात आला.परंतु काही ग्रामस्थांच्या आडमुठ्या धोरणामुळे परत तो चालु करावा लागला.त्यामुळे शिंदोडीची सुरक्षा "रामभरोसे" असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.वेळीच हि परीस्थिती आटोक्यात आली नाही तर भविष्यात याचे गंभीर परीणाम सर्व ग्रामस्थांना भोगावे लागणार आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या