शिरूरमध्ये विनाकारण रस्त्यावर फिराल तर...

शिरूर, ता. 24 एप्रिल 2020: जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घालायला सुरवात केल्यानंतर त्याला आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. पण, अनेकजण घराबाहेर पडताना दिसतात. यामुळे त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.


शिरूर नगरपालिकेने व शासनाने दिलेल्या नियमांचे उल्लंघन करून रस्त्यावर विनाकारण मास्क न लावता फिरणाऱ्या व रस्त्यावर थुंकणाऱ्या नागरिकांवर पाचशे रुपये दंड किंवा फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती शिरूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली. या कारवाईची अंमलबजावणी सुरू झाली आहे.शिरूर नगरपालिका हद्दीतील किराणामाल दुकान इतर दुकाने, भाजी पाला, फळ मार्केट व दूध डेअरी या सर्व सकाळी सात ते बारा या वेळचे उघडे राहणार आहे.
शहरात वेळोवेळी जंतुनाशक एकाची फवारणी सुरू आहे. अशा अनेक सुविधा शिरूर शहरात नगर परिषदेच्या वतीने करण्यात येत असून, कधी काही अतिउत्साही नागरिक शहरात विनाकारण फिरत असल्याचे चित्रही निर्माण झाले आहे.शिरूर नगर परिषदेच्यावतीने कडक निर्बंध करण्याचे ठरवले असून अशा बेपर्वा नागरिकांवर व विक्रेते यांनी मास्क न लावता फिरणे, विनाकारण फिरणारे नागरिक, रस्त्यावर भुंकणारे नागरिक यांच्यावर पाचशे रुपये दंड अशी कारवाई करण्यात सुरुवात झाली आहे. शिरूर नगर परिषदेचे स्वच्छता निरीक्षक दत्तात्रय बर्गे व मुकादम मनोज अहिरे, बाळासाहेब साळवे यांच्यामार्फत दंडाची कारवाई सुरू आहे. जर दंड भरला नाही तर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचेही मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या