देशाच्या संरक्षणासाठी माजी सैनिक उतरले रस्त्यावर...

शिरूर, ता. 26 एप्रिल २०२० (संपत कारकूड): पाबळ फाटा-वरुडे रोड येथे सात माजी सैनिकांनी करोनाचे नियम पाळले जावेत यासाठी देशभक्त तुकाराम डफळ व त्यांच्या टीमने चेक पोस्ट तयार केले असून, नियम न पाळणाऱ्या नागरिकांना शिस्त लावण्यासाठी माजी सैनिक रस्त्यावर उतरले आहेत.


एकीकडे शिस्तीमुळे कोरोनाचा प्रभाव कमी करण्यासाठी संपूर्ण देश यशस्वी होत असून, सैनिकांकडे असलेल्या शिस्तीचा करोना युद्धात चांगला उपयोग होत असताना दिसत आहे. जिथे-जिथे माजी सैनिक आहेत, ते एकत्र येऊन अंतर्प्रेरणाने स्वतःहून घराच्या बाहेर पडून एखादया चौकात, मोठ्या रस्त्यावर, येणाऱ्या-जाणार्यांना हटकत आहेत. मास्क लावणे, निष्कारण बाहेर न फिरणे, सामाजिक अंतर ठेवणे, बोगसगिरी इत्यादी गैरशिस्तीवर नजर ठेवत असून, वेळप्रसंगी चुका करणाऱ्यांना शिक्षाही करीत आहेत. मानव जातीवर कोरोनारूपी राक्षसाला कायमचे संपविण्यासाठी हे अघोषित युद्ध माजी सैनिक तुकाराम डफळ, सुभेदार चंद्रशेखर जाधव, हवालदार सुनील चौधरी, हवालदार चंद्रशेखर, हवालदार सुनील शेंबडे, हवालदार सुरेंदर, हवालदार  फुटाणे, ऍम्बुलॅन्स ड्रायव्हर सुनील साबळे आणि माजी सरपंच वसंत चौधरी हे योद्धे लढत असून, त्यांचे हे काम पाहून कौतुकाचा विषय ठरत आहे.दरम्यान, कोणत्याही सूचना नसताना आपले देशाप्रती हे कर्तव्य आहे, अशा भावना त्यांच्याकडून व्यक्त होत आहेत. जोपर्यंत कोरोना संपणार नाही तोपर्यंत आम्ही हे काम करणार असल्याची भावना वरील सात सैनिकांनी व्यक्त केली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या