शिरूर तालुक्यातील गावे बंद पण रस्ते चालू...

मांडवगण फराटा, ता. 2 मे २०२० (संपत कारकूड): कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून शिरूर पूर्व भागातील वडगाव रासाई, मांडवगण फराटा गावामध्ये ग्रामपंचात पातळीवर खबरदारीचा उपाय म्हणून नुकताच तीन ते पाच दिवसांचा लॉक डाऊन घेतला असला तरी काटेकोर आदेश पाळणे हे या दोन गावातील जनतेच्या अजून पचनी पडले नाही. नागरिक रस्त्यावर मोटर सायकल घेऊन आपले काम करीत असलेने रस्ते चालू...  आणि गाव 'बंद'ला हरताळ फसला जात आहे.शिरूर तालुक्यात करोनाचे रुग्ण आढळले असताना ग्रामीण जनता मात्र अजूनही गाफील आहे. तोंडाला मास्क न लावता फिरणे, काही काम नसतानाही विनाकारण गावात फेरफटका मारणे, ग्रामपंचात स्तरावरील दिलेले आदेश न पाळणे याबाबत ग्रामपंचायतींनी आपल्यापरीने सर्व उपाययोजना केल्या आहेत. गावातीलच काही सुज्ञ नागरिकांनी जरा नियम सांगावयास गेले तर, तरुणांची लगेचच डोकी गरम होत आहेत.

वडगाव रासाई येथील एका चित्रकाराने बंद काळातील रास्ता का चालू करता? असे विचारले असता गावातील बेफिकीर तरुणांच्या रोषाला सामोरे जावे लागेल आहे. प्रशासन पातळीवर लॉक डाऊनची अंमलबाजवणी व कार्यवाही करणारा ग्रामसेवक असे प्रसंग अजिबात गांभीर्याने घेत नसलेची बाब वडगाव रासाई येथे अनुभवास आली आहे. करोना संकट शिवेवर पोचले असून, त्याची गंभीरता काही नागरिक घेत नाहीत, अशांवर आदेश भंगाचे गुन्हे दाखल करण्याची गरज आहे.

वडगाव रासाई येथील ग्रामसेवक रासकर यांना फोनद्वारे संपर्क केला असता सांगितले कि, 'प्रशासनाने कुठे कुठे लक्ष दयायचे, आम्ही सांगूनही नागरिक ऐकत नाहीत.'Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या