शिरूरमधून 'ते' परतणार आपल्या घरी...

शिरूर, ता. 3 मे 2020: शिरूर येथे लेबर कॅम्पमध्ये वाशिम जिल्हयामधील 44 नागरिक आहेत, त्यांना घरी परतण्यासाठी परवानगी मिळाल्याची माहिती शिरुरच्या तहसीलदार लैला शेख यांनी दिली.कोरोनाच्या संकटामुळे पुणे, मुंबई येथे काम करणाऱ्या मजूरांनी वाहने मिळत नसल्याने पायीच घराकडे वाटचाल सुरू केली होती. मात्र, जिल्हाबंदीचे आदेश असल्यामुळे शिरूर तालुक्यांच्या हद्दी मध्ये सुमारे दोनशे मजुरांना अडवून लेबर कॅम्पमध्ये ठेवण्यात आले होते. शिरूर, कारेगाव, शिक्रापूर, कोरेगाव भिमा येथे लेबर कॅम्प केलेले आहे.


शिक्रापूर दरम्यान सुमारे ४४ मजूरांना पोलिसांनी रोखून त्यांना लेबर कॅम्प मध्ये ठेवले होते. प्रशासनाने त्यांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली होती. सरकारने या अडकलेल्या नागरिकांना घराकडे परतण्याची परवानगी दिली आहे. त्यानंतर तहसीलदार लैला शेख यांनी वाशिम जिल्हाधिकारी यांच्याकडून यासंबंधी परवानगी प्राप्त करून घेतली.वाशिम जिल्हाधिकाऱ्यांनी सुध्दा हिरवा कंदील दिल्यानंतर मजुरांची वैद्यकीय तपासणी करून बस मधून त्यांना आपल्या मुळ गावी पोहचविण्यात येणार आहे. अद्यापही इतर जिल्हयामधील मजुरांना घराकडे जाण्यासाठी परवानगी मागितली असून, ती मिळताच सर्वाना मुळ गावी सोडण्यात येईल, असे तहसीलदार लैला शेख यांनी सांगितले. एक महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर मजुर गावाकडे पोहचणार असल्याचे समजल्यानंतर त्यांना आनंद झाला.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या