शिक्रापूर पुन्हा डेंजर-हायरिस्क झोनमध्ये...

शिक्रापूर, ता. 3 मे 2020: जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असताना लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. मात्र, लॉकडाऊनदरम्यानही कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. शिक्रापूर डेंजर-हायरिस्क झोनमध्ये गेला आहे.शिक्रापूर (ता. शिरूर) परिसरात गेल्या दीड महिन्यात चार कोरोनाबाधित आढळले आहेत. शनिवारी (ता. 2) एका महिला रुग्णाची त्यामध्ये भर पडली. संबंधिक महिला गर्भवती असून, तिच्या कुटुंबीयांनीच कोरोना पॉझिटिव्ह अहवालाची माहिती आरोग्य विभागाला दिली. त्यानंतर संबंधित महिलेला तातडीने पुण्यात ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पण, तो अहवाल खासगी लॅबमधून आला आहे.
शिक्रापूर-सणसवाडी-विठ्ठलवाडी परिसरात आढळलेल्या चार रुग्णांपैकी 23 एप्रिल रोजी एक रुग्ण दगावला. सुदैवाने बाकीचे रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मात्र, येथील एका सोसायटीमधील गरोदर महिला कोरोनाबाधित असल्याची माहिती तिच्या कुटुंबीयांनीच आरोग्य विभागाला दिली आणि प्रशासनाची धावपळ उडाली. सदर महिलेचा मुंबई येथील एका खाजगी लॅबचा रिपोर्ट कोरोना-पॉजिटिव्ह असल्याचे तिच्या कुटुंबीयांनी सांगितल्यानंतर तिला प्रशासनाने पुण्यात ससूनमध्ये दाखल केले आहे. तरी सदर खाजगी लॅब अधिकृत आहे का? तसेच त्या रिपोर्टवर अधिकृत कोरोना-पॉजिटिव्ह जाहिर करणे गंभीर होवू शकते. या सर्व शक्यता लक्षात घेवून सदर महिलेला पुण्यात ससून रुग्णालयात दाखल करुन तिचे नमूने तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे पाठविले आहेत. तो अहवाल हाती आल्यानंतरच सदर महिलेबाबत अधिकृतपणे कोरोनाबाबतीत माहिती जाहिर केली जाईल, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. डी. शिंदे यांनी दिली.
दरम्यान, श्रीक्षेत्र विठ्ठलवाडी (ता. शिरूर) येथील दोन वर्षीय चिमुरडीचा राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडून करोना अहवाल निगेटिव्ह आला असल्याची माहिती तळेगाव ढमढेरे येथील वैद्यकीय अधिकारी प्रज्ञा घोरपडे यांनी दिली. चिमुरडीचा अहवाल निगेटिव्ह आल्याने ग्रामस्थांनी व आरोग्य अधिकाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या