निर्वीत अपघातात एकाचा मृत्यू; प्रकरण दाबण्याचा प्रयत्न?

शिरुर, ता. ३ मे २०२० (प्रतिनिधी): काही वर्षापुर्वी अजय देवगणचा "दृश्यम" नावाचा चित्रपट आला होता.एका गुढ खुणाचं रहस्य पोलिसांनाही  लवकर सापडत नाही. असं काहीस कथानक असलेला तो चित्रपट होता.असाच काहीसा प्रकार निर्वी (ता.शिरुर) येथे घडला असुन एका व्यक्तीचा अपघात झाल्यानंतर त्या व्यक्तीला सरकारी दवाखान्यात नेण्यात आले.परंतु तो मृत झाला असल्याचे कळताच त्याचा पोस्टमार्टम न करता पोलिसांना कोणतीही माहिती न देता परस्पर त्याचा अंत्यविधी उरकण्यात आला.तसेच त्याच्या कुटुंबियांना धमकावण्यात आलं.त्यामुळे हा नक्की अपघात होता की खुन...? असा प्रश्न उपस्थित होत आहे.२८ एप्रिल रोजी निर्वी येथील बापु कुलथे (वय ६०) या व्यक्तीला निर्वी येथील मुख्य चौकात अंदाजे सायंकाळी ७ च्या सुमारास चारचाकी गाडीची जोरदार धडक बसली.त्यानंतर ती गाडी निघुन गेली.बापु कुलथे हे मुख्य चौकात २० मिनिटे अपघातग्रस्त अवस्थेत पडुन होते.परंतु कोणीही त्यांच्या मदतीला आले नाही.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या सगळीकडे लॉक डाऊन असल्यामुळे निर्वी येथील गजबजलेल्या चौकात गर्दी नव्हती.याचाच फायदा घेत अपघात करणारा व्यक्ती पळुन जाण्यात यशस्वी ठरला.अपघात झाल्यानंतर २० मिनिटांनी गावातील काही ग्रामस्थांनी जखमी अवस्थेत असलेल्या बापु कुलथे यांना चारचाकी गाडीत न्हावरे येथील ग्रामीण रुग्णालयात नेले परंतु बापु कुलथे यांना गाडीतच ठेऊन रुग्णालयाच्या मेडिकल ऑफिसर डॉ नेहा पाटील यांना बाहेर बोलावुन घेतले.त्यावेळी नेहा पाटील यांनी कुलथे हे मृत झाल्याचे संबंधितांना सांगितले.तसेच तुम्हाला मयत व्यक्तीचा पोस्टमार्टम करावा लागेल त्यांना आत आना असे सांगितले.परंतु मयताच्या भाच्याने आम्हाला पेशंट घरी न्यायचे आहे असे सांगितले.त्यानंतर तेथील डॉक्टरांनी त्याच्याकडून एक सही घेऊन त्यांना जाण्यास सांगितले तसेच न्हावरे दूरक्षेत्र पोलिसांना याबाबत माहिती कळवली.


निर्वी गावात दहशतीचे वातावरण...
बापु कुलथे यांना ज्या गाडीने उडविले त्या गाडीत २ जण होते.तसेच गाडीचा चालक हा दारु पिलेला होता.तसेच त्या दिवशी तो गावात भरधाव वेगाने गाडी चालवत होता.त्यामुळे त्या दिवशी अनेक अपघात होता होता वाचले.परंतु भरधाव वेगाने गाडी चालवत असताना बापु कुलथे यांना धडक बसल्याने त्यांचा मात्र दुर्दैवी अंत झाला.त्यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.बापु कुलथे यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचा पोस्टमार्टम करण्यात यावा अशी मागणी त्यांच्या काही नातेवाईकांनी केली होती.परंतु गावातील काही राजकीय पुढाऱ्यांनी त्यांच्या नातेवाईक व कुटुंबियांवर दबाव आणला.तसेच या प्रकरणाची वाच्यता कुठे केल्यास परीणाम वाईट होईल अशी धमकी दिल्याने पुर्ण कुटुंबीय भीतीच्या सावटाखाली आहे.अशी गावात चर्चा आहे.

पोलिसांची भूमिका संशयास्पद...
बापु कुलथे यांचा अपघात २८ एप्रिल रोजी झाला.त्यावेळेस गावातील काही राजकीय व्यक्तींनी यात हस्तक्षेप करुन पोस्टमार्टम न करता मृतदेह तसाच घरी आणला.तसेच कोरोनामुळे उदभवलेल्या परीस्थितीचा फायदा घेत कोणत्याही नातेवाईकाची वाट न पाहता तसेच नातेवाईकांच म्हणणं न ऐकूण घेता.घाईघाईत अंत्यविधी उरकुन घेतला.पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलीस निर्वीत पोहचले परंतु तोपर्यंत मृतदेह पुर्णपणे जळाला होता.त्यानंतर ४ दिवस उलटूनही अद्याप कोणावरही गुन्हा दाखल झालेला नाही.याबाबत शिरुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले,"निर्वी गावातील अपघाताच्या प्रकाराबाबत अद्याप कोणाचीही फिर्याद दाखल झालेली नाही.तसेच आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार आम्ही याबाबत पुढील तपास करत आहोत.

कुलथे कुटुंबीय गप्प का...?
बापु कुलथे यांचा अपघात करणारा व्यक्ती गावातीलच आहे.परंतु गावातील राजकीय पुढाऱ्यांचा तो नातेवाईक असल्याने कुलथे कुटुंबीय भयभीत झालेले आहे का...? तसेच बापु कुलथे यांनी आधीच आपले मृत्युपत्र केले होते.त्यात त्यांनी आपली संपत्ती आपल्याच जवळच्या नातेवाईकांच्या नावावर केली होती.त्यामुळे  संपत्तीच्या हव्यासापायी नातेवाईक गप्प तर बसले नाहीत ना...? असा सुर सर्वत्र उमटत आहे.

याबाबत निर्वीचे पोलीस पाटील राजेंद्र सोनवणे यांना संपर्क साधला असता ते म्हणाले सदर प्रकार झाला तेव्हा मी गावात नव्हतो.मी माझ्या वैयक्तिक कामासाठी बाहेर गेलो होतो.परंतु या प्रकाराबाबत पोलिसांना माहिती दिलेली आहे.

No photo description available.


Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या