कासारी येथे पाण्याअभावी उभी पिके जळू लागली

Image may contain: plant, grass, sky, tree, outdoor and nature
तळेगाव ढमढेरे, ता. ७ मे २०२० (एन बी मुल्ला): कासारी येथे तीव्र पाणी टंचाई जाणवू लागली असुन कासारी-निमगाव म्हाळुंगी लघू वितरीकेतून चासकमानचे पाणी सोडण्याची मागणी कासारीच्या सरपंच सुनीता भुजबळ यांनी निवेदनाद्वारे चासकमानच्या शाखाधिकाऱ्यांकडे केली आहे.कासारीच्या सरपंच सुनीता भुजबळ यांनी चासकमानच्या शाखाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनानुसार डीवाय १३ या लघुवीतरिकेतून चासकमानच्या पाण्याचे आवर्तन सोडण्यात यावे तसेच लघु वितरिकेमधून पाणी सोडून  कासारी गावच्या पिण्याच्या पाण्यासाठी असलेले गावतळे भरून घेण्यात यावे अशी मागणी केली आहे. उन्हाळ्यामुळे सध्या तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीलाही पाण्याची कमतरता जाणवू  लागली आहे.सध्या शेतातील उभी पिके आणि जनावरांचा चाराही जळून गेला आहे. त्यामुळे तातडीने चासकमानचे पाणी सोडण्याची मागणी सरपंच सुनीता भुजबळ तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी केली आहे.यापूर्वीही परिसरातील नागरिकांनी पाणी सोडण्याबाबत चासकमानच्या अधिकाऱ्यांकडे अर्ज केलेला आहे.तरीही त्याची दखल घेतलेली नाही. त्यामुळे तातडीने या लघु वितरीकेतून पाणी सोडण्याचे नियोजन करून पूर्णक्षमतेने पाणी सोडण्याची मागणी परीसरातील ग्रामस्थांनी केली आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या