धमकी देणाऱ्या तरुणांवर अखेर गुन्हे दाखल...

Image may contain: text
शिरुर, ता. ८ मे २०२० (प्रतिनिधी): कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  लॉकडाऊनच्या काळात गावातील बंद केलेला रास्ता का चालू करता...? असे विचारले असता वडगाव रासाई येथील प्रसिद्ध चित्रकार ज्ञानेश्वर ढवळे यांना गावातील तरुण सागर लहानू कोळपे व कृष्णा हरी पवार यांनी धमकी देऊन शिवीगाळ केल्या प्रकरणी भा.द.स. ५०४, ५०६, ३४ अंतर्गत मांडवगण फराटा येथे गुन्हे दाखल झाले आहेत.लॉकडाऊनच्या नियमांचा  भंग होत असल्याने गावचे ग्रामसेवक राजाराम रासकर तसेच सरपंच, उपसरपंच व सदस्य नटराज शेलार यांच्याकडे ढवळे यांनी तक्रार करूनही तरुणांवर काहीच परिणाम होत नव्हता. नियम मोडून उलट धमकी देऊन या तरुणांनी चित्रकार यांना टार्गेट केले होते. मला न्याय मिळत नाही म्हणून एका व्हॉटसअप ग्रुपवर पत्रकारांना ढवळे यांच्याकडून मदतीचे आव्हान करण्यात आले होते. तत्काळ या घटनेची दखल www.shirurtaluka.com ने घेऊन गाव बंद रस्ते चालू... अशी बातमी देऊन याकडे लक्ष वेधले होते.चित्रकार ढवळे यांनी शिरुर तालुक्याचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनाही हा विषय सांगून कारवाई व्हावी, अशी विनंती केली होती. मांडवगण फराटा पोलीस स्टेशनकडे दोन हेलपाटे मारुन झाले परंतु पोलिसांकडूनही वेळ मारून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली जात होती.

मात्र वरिष्ठांकडून आलेल्या एका मॅसेजने अखेर मांडवगण फराटा येथील जमादार सुभाष रुपनवर तसेच आबा जगदाळे यांनी वरील तरुणांवर गुन्हे दाखल केले आणि अखेर चित्रकाराला न्याय मिळाला. यामुळे एका सुशिक्षित तरुणाला चांगले वागूनही मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले तर सामान्य नागरिकांचे काय हाल होत असतील हे वेगळे सांगायची गरज नाही.

No photo description available.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या