...म्हणून तळेगावात माय-लेकराची आत्महत्या

Image may contain: plant and outdoor
शिरुर, ता. ८ मे २०२० (प्रतिनिधी): तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील आई व मुलगा यांनी आजारपणाला कंटाळुन आत्महत्या केल्याचे सिद्ध झाले असुन  पोलिसांना जितेंद्र जेधे याने आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी सापडली आहे.महिलेचे दोन्ही हात बांधले असल्याचे निदर्शनास आल्याने मुलाने आईचा खून करून आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तविला जात होता.शिक्रापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू प्रकरणी नोंद केली होती.मात्र आजारपणाला कंटाळून मायलेकराने आत्महत्या केल्याचे अखेर समोर आल्याने याला पूर्णविराम मिळाला आहे.मंगळवार (दि.५) रोजी आई व मुलाने गळफास घेतल्याची घटना समोर आली होती.जितेंद्र बाळासाहेब जेधे (वय ४४) व सुंदराबाई बाळासाहेब जेधे (वय ६० दोघे रा. तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर) असे आत्महत्या केलेल्या मायलेकराचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला. यावेळी पोलिसांना जितेंद्र जेधे याने आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी सापडली. आम्ही दोघे आमच्या आजारपणाला कंटाळून आत्महत्या करीत आहे, असे चिठ्ठीत नमूद केले होते.पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक उपनिरीक्षक देविदास दगडे करीत आहे.अंत्यविधीसाठी ठेवले  होते चिठ्ठीसोबत पैसे...
जितेंद्र जेधे व सुंदराबाई जेधे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीसोबत काही पैसे देखील ठेवले असून या पैशातून आमचा अंत्यविधी करण्यात यावा असे सुचविले असल्याने अनेक दिवसांपासून आत्महत्या करण्याचा या मायलेकांचा विचार असल्याचे दिसून येत आहे.


No photo description available.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या