दवाखान्याच्या बाहेरच घातले रुग्णाच्या डोक्याला टाके...

करडे, ता. 11 मे 2020 (तेजस फडके): येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डोके फुटल्याने उपचारासाठी आलेल्या रुग्णाला येथील वैद्यकीय अधिकारी उज्वला बाभुळगावकर यांनी दवाखान्याच्या ऑपरेशन थिएटर मध्ये न नेता दवाखान्याच्या बाहेरच टाके घातल्याचा धक्कादायक प्रकार शनिवार (ता. 9) सकाळी ९ वाजता घडल्याने संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.करडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय उपचार करण्यासाठी लंघेवाडी, चव्हाणवाडी, तसेच आसपासच्या परीसरातून ग्रामस्थ येत असतात. परंतु, लाखो रुपये खर्च करुन उभारण्यात आलेल्या ग्रामीण रुग्णलयात जर वैद्यकीय अधिकारीच जर रुग्णांना अशी जनावरांसारखी वागणूक देत असतील तर रुग्णांनी नक्की दाद कोणाकडे मागायची प्रश्न? असा पडल्याशिवाय राहत नाही.


करडे येथील वैद्यकीय अधिकारी उज्वला बाभुळगावकर यांच्या कामकाजाविषयी यापुर्वीही अनेकवेळा ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीमध्ये तक्रारी केल्या आहेत. त्यांना याबाबत समजही देण्यात आलेली आहे. याबाबत बोलताना करडे येथील जिल्हा परीषद सदस्य राजेंद्र जगदाळे म्हणाले, झालेला प्रकार चुकीचा असून या प्रकाराबाबत सदर वैद्यकीय अधिकारी यांना समज देण्यात येईल. करडे गावचे सरपंच सुनील इसवे म्हणाले, याबाबत संपुर्ण माहीती घेऊन पुढील निर्णय घेऊ.याबाबत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी उज्वला बाभुळगावकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले कि, 'सकाळी एका रुग्णाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे काही नागरिक त्याला घेऊन आले. परंतु, त्या वेळेस दवाखान्यात फक्त मी आणि शिपाई होतो. रुग्णाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला चालणे शक्य नव्हते आणि त्याला असह्य वेदना होत होत्या. त्यामुळे त्याला ऑपरेशन थिएटर मध्ये नेण्यास पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नव्हते. त्यामुळे त्याला दवाखाण्याच्या बाहेरच उपचार करुन डोक्याला झालेल्या जखमेला टाके घातले.'

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या