Video: खिशात फक्त शंभर रुपये अन् अपघात झाला...

शिरूर, ता. 14 मे 2020: कोरोना व्हायरसची दहशत आणि आणि शेकडो किलोमीटर पायी गावी निघाले आहेत. दरम्यान एका मजुराच्या मुलीचा वाटेत अपघात झाला. अपघात झाल्यानंतर गंभीर अवस्थेत मुलीच्या उपचारासाठी वडिलांच्या खिशात फक्त शंभर रुपये होते. मात्र, पैशांची अपेक्षा न करता डॉक्टर अखीलेश राजूरकर यांनी उपचार केल्याने १७ वर्षाच्या मुलीला जीवदान मिळाले.


डॉक्टरांना वनमंत्री संजयजी राठोड व पुसदचे आमदार इंद्रनील नाईक यांनीही सहकार्य करणार असल्याचे सांगितले. परंतु, डॉक्टरांनी या मुलीची जबाबदारी आता आमची असल्याचे सांगितल्याने वनमंत्री संजय राठोड आणि आमदार इंद्रणील नाईक ही अवाक झाले. या मुलीच्या कुटुंबीयांची जेवणापासून तर औषधोपचाराचा सर्व खर्च हॉस्पिटलने उचलला आहे. डॉ. राजूरकर यांनी यापूर्वीही अनेकांना जीवदान दिले आहे. शिवाय, सामाजीक उपक्रमामध्ये त्यांचा नेहमीच सहभाग असतो.


याबाबत सविस्तर असे कि, पुणे जिल्ह्यात रांजणगाव एम आय डी सी ही पंचतारांकित औद्योगिक वसाहत म्हणून ओळखली जाते. सध्या लॉकडाऊन मधून गावी पायी अनेक मजूर जात आहेत. यात कारेगाव येथे बळीराम जाधव हे आपल्या पत्नी व मुलासह राहणारे मजूर कुटुंब हे रात्रीच्या वेळी गावी पायी निघालेले होते. कारेगाव येथून निघालेल्या मजूरांना रस्त्याने जात असताना यातील बळीराम जाधव यांची मुलगी जयश्री जाधव (वय १७, मु पो. विरळा, ता. दिग्रस, जिल्हा यवतमाळ) या मुलीचा रस्त्यात अपघात होऊन डोक्याला मार लागल्याने गंभीर अवस्थेत रस्त्यावर पडली. यावेळी स्थानिकांनी तत्काळ शिरूर येथील श्री गणेशा हॉस्पिटल मध्ये मुलीला दाखल केले.


श्री गणेशा हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर अखिलेश राजूरकर, डॉ विशाल महाजन यांनी सदर मुलीची परिस्थिती पाहता उपचार सुरू केले. अपघाताची माहिती कळताच वनमंत्री संजय राठोड, पुसदचे आमदार इंद्रनील नाईक यांनी जखमी मुलीची विचारपूस, उपचारासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. परंतु, श्री गणेशा हॉस्पिटल ने गंभीर अवस्थेतील मुलीचे सर्व उपचार मोफत करत रुग्णाच्या नातेवाईकांना धीर दिला. या मुलीचे जीव वाचविण्यासाठी श्री गणेशा हॉस्पिटलचे डॉक्टर अखिलेश राजूरकर, डॉ विशाल महाजन, डॉ. सारंग पाठक, डॉ. सौरभ पाठक, डॉ. राजेंद्र ढोले, डॉ. विष्णु मोरे, सूरज खरात, अविनाश अखंड, ऋतूराज चव्हाण, ऋषिकेश चव्हाण, विक्की नाईक, संगीता कोल्हे, वैशाली पडवळ यांनी सहकार्य केले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या