पिंपळसुटीत लगड कुटुंबीयांकडुन गरजूंना किराणा वाटप...

Image may contain: one or more people, people sitting and people standing
सादलगाव, ता. ५ मे २०२० (संपत कारकुड): कोरोनाच्या संकट काळात खेडेगावात मोलमजुरीवर आपला उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबाला सध्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.अश्या कुटुंबाला घरात आवश्यक असणारे किराणा सामानही घेणे शक्य होत नाही.त्यामुळे पिंपळसुटी (ता. शिरूर ) येथील बबनराव लगड यांनी कै. हरिभाऊ लगड तसेच चंद्रभागा लगड यांच्या स्मरणार्थ ६५ गरीब नागरिकांना शिरुर-हवेली चे आमदार अशोक पवार यांच्या हस्ते किराणा साहित्याचे वाटप केले.सध्या रोजगार बंद झाल्यामुळे घर खर्चाला पैसे तरी कुठून येणार, मायबाप सरकारने गहू-तांदूळ देऊन जीवन जगण्यापुरता घास दिला आहे. शासन आपल्या परीने सर्व प्रयत्न करीत आहे. सरकारने दिलेल्या धान्याने गोरगरिबांच्या चुली पेटल्या आहेत. परंतु अश्या अनेक कुटुंबाला मदतीची गरज आहे.

हिच कर्तव्य भावना मनात ठेऊन पिंपळसुटी येथील बबनराव लगड व त्यांच्या कुटुंबांनी गावातील ६५ गरीब कुटुंबाला किराणा साहित्य वाटप केले. त्यामध्ये साखर, तेल, मीठ, मसाला, कडधान्य, मूग, हुलगा, चहापावडर, तांदूळ असे जीवनावश्यक साहीत्य होते. या कार्यक्रमास माजी सरपंच संतोष कौठाळे, चंद्रकांत सूर्यवंशी,दत्तात्रय लगड, नानासो लगड, माणिक थोरात, दत्ता ठोंबरे आदी मान्यवर उपस्थित होते.

No photo description available.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या