Video: मंगलदास बांदल म्हणाले; 'मै हू डॉन' अन्...

शिक्रापूर, ता. 18 मे 2020 (PoliceKaka): जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांनी 'मै हू डॉन...' हे गाणे म्हटले पण हे गाणे सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या अंगलट आले. कोरोना लॉकडाऊन काळातील निर्बंधांचे पालन न केल्याबद्दल बांदल यांच्यासह आठजणांविरुद्ध शिक्रापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.पोलिस हवालदार ब्रह्मा पोवार यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. बांदल हे 'मै हू डॉन...'  हे गाणे आपल्या साथीदारांह एकत्र गात असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ पोवार यांच्या व्हॉटस अपवर व तसेच बाबू पाटील ढमढेरे यांच्या फेसबुकवर शेअर करण्यात आला होता. या व्हिडिओमध्ये एकूण आठ ते दहाजण दिसतात. त्यातील संदीप भोंडवे, संजय जगताप हे माझ्या ओळखीचे असल्याचे पोवार यांनी आपल्या फिर्यादित म्हटले आहे. त्यामुळे त्यांच्यावरही गुन्हा नोंद झाला आहे.


कोरोना महासाथीच्या काळात जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदी तसेच संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे पाचजणांपेक्षा एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. या व्हिडिओत बांदल यांच्यासह इतर त्यांचे मित्र स्पीकरवर गाणी म्हणत होते. मोठा साऊंडट्रकही लावण्यात आलेला होता. बांदल हे 'मै हू डॉन...'  हे गाणे म्हणत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. त्याला इतरजण साथ देत असल्याचे दिसून येत आहे. यात कोणीही मास्क घातलेला नव्हता. हे सारे नियमांचे बंधन उल्लंघन असल्याचे फिर्यादित नमूद करण्यात आले आहे.संबंधित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तो वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचला. त्यामुळे अशा एकत्र येण्यावर बंधने असतानाही त्याचे उल्लंघन केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बांदल यांच्याविरुद्ध पुण्यातील एका सराफ व्यावसायिकाकडे खंडणी मागितल्याच्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. त्यावर ते सध्या जामिनावर आहेत. त्यांना वैद्यकीय कारणांमुळे जामीन देण्यात आला आहे.

चर्चेला उधान...
शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे पुणे जिल्ह्यातील बड्या राजकीय नेत्यांवर अचानक गुन्हे दाखल झाल्याची घटना घडल्यानंतर शिरूर तालुक्यात चर्चेला उधान आले होते. पुणे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळासह आदी कार्यकर्त्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

कार्यकर्त्याचा अति उत्साही पणा अंगलट…
मंगलदास बांदल यांचे कट्टर समर्थक समजल्या जाणाऱ्या त्यांच्याच एका अति उत्साही कार्यकर्त्याने बांदल हे गात असलेले गाणे अति उत्साही पणाने सोशल मिडियावर व्हायरल केले आणि त्यानंतर हा सर्व प्रकार घडला असल्याने बांदल यांच्याच अति उत्साही कार्यकर्त्याचा अति उत्साही पणा अंगलट आल्याची चर्चा आहे.

No photo description available.

मंगलदास बांदल यांनी यापूर्वी गायलेले गाणे व्हायरल झाले होते....

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या